आजीने रागाच्या भरात येऊन 14 महिन्याच्या बाळाचा चावा घेऊन मारहाण केली, बाळाचा मृत्यू

गुजरातमधील अमरेली जिल्ह्यात 14 महिन्याच्या मुलगा रडू लागला.आजीने मुलाच्या रडण्याचा आवाजाला कंटाळून त्याचा चावा घेतला नंतर एवढ्याने देखील आजीचे समाधान झाले नाही तर तिने बाळाला मारहाण केली

आजीने रागाच्या भरात येऊन 14 महिन्याच्या बाळाचा चावा घेऊन मारहाण केली, बाळाचा मृत्यू

गुजरातमधील अमरेली जिल्ह्यात 14 महिन्याच्या मुलगा रडू लागला.आजीने मुलाच्या रडण्याचा आवाजाला कंटाळून त्याचा चावा घेतला नंतर एवढ्याने देखील आजीचे समाधान झाले नाही तर तिने बाळाला मारहाण केली या मारहाणीत बाळाचा मृत्यू झाला. आजीला खुनाच्या गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. 

गुजरातच्या राजस्थळी गावात राहणारे 14 महिन्याच्या बाळाला सिव्हिल रुग्णालयात आणले त्यावेळी बाळाच्या गालावर, डोळ्यावर कपाळी, हात आणि पायावर चावा घेतला होता. तसेच त्याला बेदम मारहाण देखील करण्यात आली होती. बाळाची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

पोलिसांना संशय आहे की बाळाच्या आजीने तांत्रिक विधीमुळे बाळाला मारहाण केली. मुलाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बाळाची आजी 3 सप्टेंबर रोजी बाळाला झोपवायला खोलीत घेऊन गेली. बाळ रडत होते आणि त्याचे रडणे थांबत नव्हते.बाळाच्या रडण्याला कंटाळून रागाच्या भरात येऊन तिने बाळाचा चावा घेतला. आणि मारहाण केली. त्यात बाळाचा दुर्देवी मृत्यू झाला. 

Edited by – Priya Dixit 

 

Go to Source