गोगटे, आरपीडी, शानभाग, भंडारी, संगोळी रायण्णा विजयी

चिटणीसला ताराराणीने रोखले : बीडीएचए हॉकी स्पर्धा बेळगाव : बेळगाव जिल्हा हॉकी संघटना आयोजित बीडीएचए चषक आंतरशालेय-आंतरमहाविद्यालयीन हॉक स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात गोगटे, आरपीडी, शानभाग, ताराराणी, संगोळी रायण्णा, भंडारी संघांनी विजय संपादन करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या हॉकी स्पर्धेत महाविद्यालयीन विभागात झालेल्या सामन्यात मुलांमध्ये गोगटे […]

गोगटे, आरपीडी, शानभाग, भंडारी, संगोळी रायण्णा विजयी

चिटणीसला ताराराणीने रोखले : बीडीएचए हॉकी स्पर्धा
बेळगाव : बेळगाव जिल्हा हॉकी संघटना आयोजित बीडीएचए चषक आंतरशालेय-आंतरमहाविद्यालयीन हॉक स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात गोगटे, आरपीडी, शानभाग, ताराराणी, संगोळी रायण्णा, भंडारी संघांनी विजय संपादन करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या हॉकी स्पर्धेत महाविद्यालयीन विभागात झालेल्या सामन्यात मुलांमध्ये गोगटे कॉलेजने जीएसएस कॉलेजचा 1-0 असा पराभव केला. या सामन्यात सागर बबलीने एकमेव गोल केला. दुसऱ्या सामन्यात संगोळी रायण्णा महाविद्यालायाने पिपलट्री महाविद्यालयाचा 3-1 असा पराभव केला. संगोळी रायण्णातर्फे काळोजीने 2 तर सुमीर देसाईने 1 गोल केला. पिपलट्रीतर्फे श्लोक देसाईने 1 गोल केला. मुलींच्या विभागात खेळविण्यात आलेल्या सामन्यात राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाने (आरपीडी) संगोळी रायण्णा महाविद्यालयाचा 3-0 असा पराभव केला. आरपीडीतर्फे मनिषा शिंगेली, विजयलक्ष्मी मुलीमनी, मृणाली भाटे यांनी प्रत्येकी 1 गोल केला. शालेय स्पर्धेत मुलांच्या विभागात व्हीएम शानभाग संघाला प्रतिस्पर्धी न आल्याने पुढे चाल देण्यात आली. मुलींच्या विभागात घेण्यात आलेल्या सामन्यात ताराराणी खानापूर संघाने जीजी चिटणीस संघाला 1-1 असे बरोबरीत रोखले. या सामन्यात ताराराणीतर्फे आयशा शेखने गोल केला. तर चिटणीसतर्फे आरुषी बसुर्तेकरने गोल केला. शेवटच्या सामन्यात एमआर भंडारी संघाने इस्लामिया संघाचा 1-0 असा पराभव केला.