तरुणांचा आवाज असणाऱ्या मृणालला सेवेची संधी द्या

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : भरतेश महाविद्यालयात प्रचार बेळगाव : येथील भरतेश वाणिज्य महाविद्यालयामध्ये लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्यातर्फे प्रचार करून तरुणांचा आवाज असणाऱ्या मृणाल यांना संधी द्यावी, असे आवाहन केले. जिल्ह्यातील तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आहे. विचार करण्याची वेळ असून योग्य विचार करूनच उमेदवार निवडावा. बाहेरुन आलेल्या उमेदवारांच्या हाती […]

तरुणांचा आवाज असणाऱ्या मृणालला सेवेची संधी द्या

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : भरतेश महाविद्यालयात प्रचार
बेळगाव : येथील भरतेश वाणिज्य महाविद्यालयामध्ये लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्यातर्फे प्रचार करून तरुणांचा आवाज असणाऱ्या मृणाल यांना संधी द्यावी, असे आवाहन केले. जिल्ह्यातील तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आहे. विचार करण्याची वेळ असून योग्य विचार करूनच उमेदवार निवडावा. बाहेरुन आलेल्या उमेदवारांच्या हाती बेळगावची सत्ता देवू नये. पूर्वीपासून बेळगाववर अन्याय करण्यात आला आहे. अशा व्यक्तीला संधी देणे अशक्य आहे. आपल्या जिल्ह्याचा स्वाभीमान राखून मृणाल हेब्बाळकर यांना विजयी करा, असे आवाहन मंत्री हेब्बाळकर यांनी केले. मृणाल हा अभियांत्रिकी पदवीधर असून जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न त्याने पाहिले आहे. स्थानिकांच्या समस्यांची चांगली जाणीव त्याला आहे. विद्यार्थ्यांना अधिक सांगण्याची गरज नसून तुम्ही सर्व मृणालला समर्थन देणार याचा आपल्याला विश्वास आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विनोद दो•न्नावर, श्रीपाल खेमलापुरे, डॉ. सावित्री दो•ण्णावर, शरद पाटील, वसंत कोडचवाड, अभिनंदन कोचेरी, संजीव दो•ण्णावर आदी उपस्थित होते.