मुंबईत भावाच्या लग्नासाठी ठेवलेली 22 लाखांची रोकड आणि दागिने घेऊन मुलगी पळाली
भावाच्या लग्नासाठी वडिलांनी पै पै जोडलेले 22 लाखांची रोकड आणि दागिने घेऊन एक महिला पसार झाली. गेल्या मे महिन्यांपासून ही महिला बेपत्ता होती. वडिलांनी मुलीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यांनतर आरोपी मुलीला पोलिसांनी अटक केली आहे. मुलीने सहा वर्षांपूर्वी एका पुरुषाशी लग्न केल्याचे सत्य लपवून ठेवले होते.
ही घटना मुंबईच्या वनराई ठाण्याच्या परिसरातील आहे. वडिलांनी मुलीकडे अनेक वर्षांपूर्वी रोख रक्कम आणि दागिने ठेवण्यासाठी दिले होते. गेल्या मे महिन्यात मुलगी बेपत्ता झाली. कुटुंबियांना नंतर समजले की तिने एका व्यक्तीशी सहा वर्षांपूर्वी लग्न केले. तिने ही गोष्ट कुटुंबियांपासून लपवून ठेवली.
मुलीचे वडील पानटपरी चालवतात. मुलगी पैसे आणि दागिने घेऊन गेल्याचे समजतातच वडिलांनी पोलीस ठाण्यात मुलीच्या विरोधात तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी मुलीचा शोध लावून तिला अटक केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे.
Edited by – Priya Dixit