लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीतर्फे “गीतरामायण” कार्यक्रम
परुळे येथील श्री. देव आदिनारायण देवस्थानच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजन
सावंतवाडी –
लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी लि. यांच्या वतीने परुळे येथील श्री. देव आदिनारायण देवस्थानच्या व्यासपीठावर अयोध्या राममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या शुभमुहूर्ताचा शुभ अवसर साधत गीतरामायणाचा बहारदार कार्यक्रम रंगणार आहे . सदर कार्यक्रम दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ठिक ५:०० वाजता आयोजित केला आहे.सांगली येथील “स्वरवैभव क्रिएशन” हा गायनमंच या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या निमित्ताने सिंधुदुर्ग वासियांना परत एकदा आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या जादुई लेखणीची व बाबूजींच्या जादूई स्वरांच्या स्वरमयी मेजवानीचा आस्वाद घेता येणे शक्य होणार आहे.
नेहमीच समाजहित जोपासणाऱ्या लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटीच्या ह्या स्तुत्य व रसिकजनांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या “प्रभू श्रीराम” या विषयाला अनुसरून असणाऱ्या कार्यक्रमास/उपक्रमास रसिकजनांचा उदंड प्रतिसाद लाभून हा कार्यक्रम पार पाडावा तसेच सदर कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यावसायिक अथवा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना जाहिरात द्यायची असल्यास त्वरित नजिकच्या लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटीच्या शाखेशी संपर्क साधावा किंवा या नंबरवर ०२३६३-२७२९२७/ ८३०८९१४०११ संपर्क साधावा. असे देखील आवाहन सोसाटीतर्फे करण्यात येत आहे.
Home महत्वाची बातमी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीतर्फे “गीतरामायण” कार्यक्रम
लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीतर्फे “गीतरामायण” कार्यक्रम
परुळे येथील श्री. देव आदिनारायण देवस्थानच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजन सावंतवाडी – लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी लि. यांच्या वतीने परुळे येथील श्री. देव आदिनारायण देवस्थानच्या व्यासपीठावर अयोध्या राममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या शुभमुहूर्ताचा शुभ अवसर साधत गीतरामायणाचा बहारदार कार्यक्रम रंगणार आहे . सदर कार्यक्रम दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ठिक ५:०० वाजता आयोजित केला आहे.सांगली येथील “स्वरवैभव […]