GSB सेवा मंडळाने काढला 400 कोटीचा विमा
मुंबईमधील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून जीएसबी सेवा मंडाळाच्या गणपतीची ओळख आहे. जीएसबी गणेशोत्सव मंडळाने या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात महागडा विमा काढल्याची बातमी समोर आली आहे. या विम्याची किंमत 400.59 कोटी रुपये आहे.जीएसबीच्या गणपतीची दरवर्षी चर्चा होत असते. या मंडळाचा गणपती बाप्पा मुंबईकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. या बाप्पाची सर्व आभूषणं सोन्या-चांदीची असतात. जीएसबी सेवा मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जीएसबीचा राजा हा गणपती मुंबईतील लोकप्रिय गणपतींपैकी एक आहे. हे गणेशोत्सव मंडळ मुंबईतल्या किंग सर्कल येथे आहे. या गणेशोत्सव मंडळाचा गणपती बाप्पा पाच दिवसांचा असतो. मिळालेल्या माहितीनुसार, यंदा या गणेशोत्सव मंडळाने 400 कोटी रुपयांचा विक्रमी विमा काढला आहे. या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक, स्वयंसेवक, स्वयंपाकी, सेवा कर्मचारी, पार्किंग आणि सुरक्षा कर्मचारी, स्टॉल कामगार यांचाही या विम्यामध्ये समावेश असेल.याशिवाय इतर विविध पॉलिसींच्या आधारे या बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांव्यतिरिक्त हे गणेशोत्सव मंडळ सोन्या-चांदी, चोरी आणि नैसर्गिक आपत्तींविरूद्ध विमा पॉलिसी देखील खरेदी करते. जीएसबी सेवा मंडळ यावर्षी आपला 70वा वार्षिक गणेशोत्सव साजरा करत आहे. 7 ते 11 सप्टेंबर या 5 दिवसांच्या उत्सवासाठी या गणेशोत्सव मंडळाने 400.59 कोटींचा विमान काढला आहे. 5 दिवसांच्या या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक मोठी गर्दी करतात.महत्वाचे म्हणजे, 2023 मध्ये या गणेशोत्सव मंडळाने 360.40 कोटी रुपयांचा विमा काढला होता. 5 दिवसांच्या गणेश उत्सवादरम्यान दिवसाला 20 हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात जीएसबीच्या गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी 1 लाखांहून अधिक भाविक येतात.हेही वाचाDahi handi : दहीहंडीसाठी पोलिसांकडून नियमावली जाहीर
गणेशोत्सवात हायकोर्टाचा लाईट लेझर बीम, डीजे सिस्टिमचा वापर रोखण्यास नकार
Home महत्वाची बातमी GSB सेवा मंडळाने काढला 400 कोटीचा विमा
GSB सेवा मंडळाने काढला 400 कोटीचा विमा
मुंबईमधील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून जीएसबी सेवा मंडाळाच्या गणपतीची ओळख आहे. जीएसबी गणेशोत्सव मंडळाने या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात महागडा विमा काढल्याची बातमी समोर आली आहे. या विम्याची किंमत 400.59 कोटी रुपये आहे.
जीएसबीच्या गणपतीची दरवर्षी चर्चा होत असते. या मंडळाचा गणपती बाप्पा मुंबईकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. या बाप्पाची सर्व आभूषणं सोन्या-चांदीची असतात.
जीएसबी सेवा मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जीएसबीचा राजा हा गणपती मुंबईतील लोकप्रिय गणपतींपैकी एक आहे. हे गणेशोत्सव मंडळ मुंबईतल्या किंग सर्कल येथे आहे. या गणेशोत्सव मंडळाचा गणपती बाप्पा पाच दिवसांचा असतो.
मिळालेल्या माहितीनुसार, यंदा या गणेशोत्सव मंडळाने 400 कोटी रुपयांचा विक्रमी विमा काढला आहे. या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक, स्वयंसेवक, स्वयंपाकी, सेवा कर्मचारी, पार्किंग आणि सुरक्षा कर्मचारी, स्टॉल कामगार यांचाही या विम्यामध्ये समावेश असेल.
याशिवाय इतर विविध पॉलिसींच्या आधारे या बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांव्यतिरिक्त हे गणेशोत्सव मंडळ सोन्या-चांदी, चोरी आणि नैसर्गिक आपत्तींविरूद्ध विमा पॉलिसी देखील खरेदी करते.
जीएसबी सेवा मंडळ यावर्षी आपला 70वा वार्षिक गणेशोत्सव साजरा करत आहे. 7 ते 11 सप्टेंबर या 5 दिवसांच्या उत्सवासाठी या गणेशोत्सव मंडळाने 400.59 कोटींचा विमान काढला आहे. 5 दिवसांच्या या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक मोठी गर्दी करतात.
महत्वाचे म्हणजे, 2023 मध्ये या गणेशोत्सव मंडळाने 360.40 कोटी रुपयांचा विमा काढला होता. 5 दिवसांच्या गणेश उत्सवादरम्यान दिवसाला 20 हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात जीएसबीच्या गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी 1 लाखांहून अधिक भाविक येतात.हेही वाचाDahi handi : दहीहंडीसाठी पोलिसांकडून नियमावली जाहीरगणेशोत्सवात हायकोर्टाचा लाईट लेझर बीम, डीजे सिस्टिमचा वापर रोखण्यास नकार