गंभीर – सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील भारताचा नवीन डाव आजपासून

वृत्तसंस्था/ पल्लेकेले गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव ही भारताचे नव्याने बनवलेले प्रशिक्षक आणि कर्णधार यांची जोडी श्रीलंकेच्या संघाविऊद्ध झटपट प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणार असून आजपासून ते सदर परिचित दक्षिण आशियाई प्रतिस्पर्ध्याचा मर्यादित षटकांच्या मालिकेत सामना करतील. आज शनिवारी येथे तीन टी-20 पैकी पहिली लढत होणार आहे. दोन वेळा विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिलेला गंभीर आता […]

गंभीर – सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील भारताचा नवीन डाव आजपासून

वृत्तसंस्था/ पल्लेकेले
गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव ही भारताचे नव्याने बनवलेले प्रशिक्षक आणि कर्णधार यांची जोडी श्रीलंकेच्या संघाविऊद्ध झटपट प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणार असून आजपासून ते सदर परिचित दक्षिण आशियाई प्रतिस्पर्ध्याचा मर्यादित षटकांच्या मालिकेत सामना करतील. आज शनिवारी येथे तीन टी-20 पैकी पहिली लढत होणार आहे.
दोन वेळा विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिलेला गंभीर आता भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून धुरा सांभाळत आहे तर ‘टी-20’ संघाची सूत्रे या प्रकारातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या सूर्यकुमारकडे सोपवण्यात आली आहेत. गंभीरची दृढता तसेच त्याचा तीव्र दृष्टिकोन यामुळे खेळाडूंना एका वेगळ्या वेगळा प्रशिक्षकाला सामोरे जावे लागणार आहे. याशिवाय नवीन टी-20 कर्णधार सूर्यकुमारचे मार्ग देखील त्यांना शिकावे लागतील. हार्दिक पंड्याला बाजूला ठेवून कर्णधारपदासाठी सूर्यकुमारची निवड ही सर्वांना चकीत करून गेलेली आहे.
 
संघ संक्रमणावस्थेतून जात असल्याने उपकर्णधार शुभमन गिल याकडे आपले स्थान मजबूत करण्याची संधी म्हणून पाहील. यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग आणि अगदी रियान पराग यासारख्या इतर खेळाडूंचेही तेच लक्ष्य असेल. रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेल पूर्ण फिट बसणार असून पंड्या, शिवम दुबे आणि फॉर्मात असलेला वॉशिंग्टन सुंदर यांच्यामुळे भारताकडे सक्षम अष्टपैलू विभाग आहे.
जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आल्यामुळे अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज या जोडीला पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील अनुकूल परिस्थितीचा फायदा घेता येईल. श्रीलंकेचे दोन अनुभवी गोलंदाज दुष्मंथा चमीरा हा आजारी असल्याने आणि चपळ नुवान तुषाराचे बोट मोडलेले असल्याने त्यांना संघात घेण्यात आलेले नाही. त्याऐवजी यजमानांनी असिथा फर्नांडो आणि दिलशान मदुशंका यांना समाविष्ट केले आहे.
श्रीलंकेने सनथ जयसूर्याची अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे आणि त्याने आपल्या संघाला भारताच्या अनुभवी स्टार्सच्या कमतरतेचा पुरेपूर फायदा करून घेण्याचे आवाहन केले आहे. चरिथ असलंकाकडे कर्णधारपद सोपवण्यात आले असून माजी कर्णधार दासून शनाका, कुसल परेरा, कुसल मेंडिस आणि अनुभवी दिनेश चंडिमल अशा काही गुणवान खेळाडूंचा या संघात समावेश आहे.
संघ : भारत-सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
श्रीलंका : चरिथ असलंका (कर्णधार), दिनेश चंडीमल, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, पाथुम निसांका, कुसल परेरा, वानिंदू हसरंगा, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, चामिंडू विक्रमसिंघे, बिनुरा फर्नांडो, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका, मथिशा पाथिराना, महीश थीक्षाना, दुनिथ वेललागे.
 सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.