उपनोंदणी कार्यालयात शॉर्टसर्किटने आग
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या उत्तर विभाग उपनोंदणी कार्यालयामध्ये शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. अचानकपणे फॅनमधून धूर येवू लागला. त्यानंतर आगीने पेट घेतला. तातडीने मुख्य फ्युज काढण्यात आली. परिणामी पुढील अनर्थ टळला आहे. त्यामुळे गुरुवारी उपनोंदणी कार्यालयातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. उत्तर विभाग उपनोंदणी कार्यालयामध्ये नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. दुपारी 12 च्या सुमारास अचानक फॅनमधून धूर येऊ लागला. तातडीने फ्युज काढण्यात आली. मात्र तोपर्यंत फॅनच्या केबल व तेथील वायर जळून खाक झाली. सुदैवानेच यामध्ये संगणक व इतर साहित्य बचावले. तातडीने वीजपुरवठा खंडित केल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी अनेकजण व्हिडिओ चित्रीकरण करण्यात गुंतले होते. तर एकट्याने नामी शक्कल लढवून जिल्हाधिकारी कार्यालयातून आग प्रतिबंधक सिलिंडर आणून फवारणी केली. तशाच प्रकारचे फवारणी सिलिंडर उपनोंदणी कार्यालयात होते. त्याची आठवण आल्यानंतर तेही सिलिंडर आणून फवारणी केली.
Home महत्वाची बातमी उपनोंदणी कार्यालयात शॉर्टसर्किटने आग
उपनोंदणी कार्यालयात शॉर्टसर्किटने आग
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या उत्तर विभाग उपनोंदणी कार्यालयामध्ये शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. अचानकपणे फॅनमधून धूर येवू लागला. त्यानंतर आगीने पेट घेतला. तातडीने मुख्य फ्युज काढण्यात आली. परिणामी पुढील अनर्थ टळला आहे. त्यामुळे गुरुवारी उपनोंदणी कार्यालयातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. उत्तर विभाग उपनोंदणी कार्यालयामध्ये नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. दुपारी 12 च्या […]
