पुतळा वादावर फडणवीसांचा नौदलावर ठपका

छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळल्यावर राजकारण तापले आहे. विरोधक पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका करत आहे. त्यांचा राजीनामा मागत आहे.या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेला …

पुतळा वादावर फडणवीसांचा नौदलावर ठपका

छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळल्यावर राजकारण तापले आहे. विरोधक पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका करत आहे. त्यांचा राजीनामा मागत आहे.या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेला माफी मागितली आहे. 

या प्रकरणी बनावट सल्लागाराला अटक केली आहे. या प्रकरणावर महायुतीच्या नेत्यांची वक्तव्ये बाहेर येत आहे. त्यात एकवाक्यता नाही. या वर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हा पुतळा नौदलाने बांधला आहे राज्य सरकारने नव्हे.जोरदार वाऱ्यामुळे पुतळा कोसळल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर गदारोळ झाल्यावर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली असून लवकरच मोठा पुतळा उभारणार अशी घोषणा केली. 

या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नौदलाने बांधल्याचे म्हटले आहे.पुतळा उभारणीसाठी जबाबदार व्यक्तीने वाऱ्याचा वेग आणि दर्जा या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले असावे.सागरी वाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे पुतळ्यात वापरले जाणारे लोह गंजण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.  

या वर प्रतिक्रिया देतांना उपमुख्यमंत्री यांनी कोणतेही वक्तव्य दिले नव्हते मात्र त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतो असे जाहीर सभेत म्हटले. लवकरात लवकर त्या ठिकाणी महाराजांचा नवीन पुतळा बसवला जाईल असे म्हणाले. घडलेली घटना चुकीची असून त्यावर कारवाई केली जाईल. 

Edited by – Priya Dixit  

 

Go to Source