भीषण आगीमध्ये इलेक्ट्रिशियनचा मृत्यू

नोएडाच्या सेक्टर-74 मधील एका बँक्वेट हॉलमध्ये आज पहाटे आग लागली. यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला सूचना देण्यात आली.

भीषण आगीमध्ये इलेक्ट्रिशियनचा मृत्यू

नोएडाच्या सेक्टर-74 मधील एका बँक्वेट हॉलमध्ये आज पहाटे आग लागली. यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला सूचना देण्यात आली.

घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आगीत अडकून एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरू असलेल्या लोटस ग्रेनेडियर बँक्वेट हॉलमध्ये आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या 15 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश मिळाले. 

बँक्वेट हॉलचा आकार मोठा असल्याने आग विझवण्यास बराच वेळ लागला. बचाव कार्यादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. 

Go to Source