विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी एकनाथ शिंदेंचा मोठा दावा, महायुती दिवाळी नंतर फटाके फोडणार

यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक वर्षाच्या अखेरीस ऑक्टोबर -नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता असून अद्याप तारखा जाहीर केल्या नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी विधानसभा निवडणुकांवर प्रतिक्रिया दिली

विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी एकनाथ शिंदेंचा मोठा दावा, महायुती दिवाळी नंतर फटाके फोडणार

यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक वर्षाच्या अखेरीस ऑक्टोबर -नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता असून अद्याप तारखा जाहीर केल्या नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी विधानसभा निवडणुकांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महायुती दिवाळी नंतर फटाके फोडणार. यंदा महायुतीचं विधानसभा निवडणुका जिंकणार. रविवारी ठाण्यात एका मेळाव्याला संबोधित करताना ते म्हणाले, सभेच्या आधी त्यांनी गुरु आनंद दिघे आणि शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. 

या वेळी त्यांनी जनतेला प्रश्न केले की, महायुती सरकारने राबविले प्रकल्प पुढे चालू ठेवावे का? सध्या या प्रकल्पांना आणि योजनांना महाविकास आघाडीकडून विरोध होत आहे. ते म्हणाले, ते रस्त्यावर मोर्चा काढत आहे दिल्ली जात आहे. काहीही झाले तरी आम्ही आमचे काम सुरूच ठेवू.

लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदार संघासाठी शिवसेना नेते नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्याच्या निर्णय घेतला त्यासाठी देखील काहींनी विरोध केला मात्र या मध्ये म्हस्के यांचा विजय झाला. 

जो पर्यंत जनतेची साथ आहे तो पर्यंत आम्ही टीकेला बळी पडणार नाही. त्यांचे विरोधकांकडे बारीक लक्ष असल्याचे ते म्हणाले. 

Edited by – Priya Dixit 

 

Go to Source