अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेभूकंपाची तीव्रता रिश्टर
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. शनिवारी भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांमध्ये घबराट पसरली होती. अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ४.५ होती. तसेच भूकंपाचे केंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १२० किलोमीटर खाली होते.
ALSO READ: काही अडचण असेल तर रेशन दुकानांबद्दल तक्रार करा कारवाई केली जाईल, मंत्री छगन भुजबळ अॅक्शन मोडवर
मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी १९ मे रोजी अफगाणिस्तानात ४.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता, जो गेल्या चार दिवसांत देशात सलग चौथा भूकंप होता. भारतीय वेळेनुसार सकाळी ८:५४ वाजता भूकंप झाला, असे एनसीएसने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. भूकंपाचे केंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १४० किलोमीटर खाली होते. यापूर्वी १८ मे रोजी अफगाणिस्तानात ४.५ तीव्रतेचा भूकंप झाला होता. एनसीएसच्या मते, भूकंप १५० किलोमीटर खोलीवर झाला. १७ मे रोजी या प्रदेशात ४.२ तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या आत १२० किलोमीटर अंतरावर होता.
ALSO READ: नाशिकच्या गंगापूर भागात विवाहित महिलेची आत्महत्या
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: औरंगाबादहून येणाऱ्या कारमध्ये २ कोटींची रोकड सापडली, दोघांची चौकशी सुरु