सावंतवाडीत भव्य सवेश नाट्यगीत गायन स्पर्धा

सैनिक नागरी पतसंस्था,सावंतवाडी व श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळाचे आयोजन सावंतवाडी – सैनिक नागरी पतसंस्था,सावंतवाडी व श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने “भव्य सवेश नाट्यगीत गायन स्पर्धा 2024” चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा सिंधुदुर्ग, रत्नागिरी व गोवा राज्य मर्यादित आहे. यात प्रथम पारितोषिक रोख रू 10,000/- […]

सावंतवाडीत भव्य सवेश नाट्यगीत गायन स्पर्धा

सैनिक नागरी पतसंस्था,सावंतवाडी व श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळाचे आयोजन
सावंतवाडी –
सैनिक नागरी पतसंस्था,सावंतवाडी व श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने “भव्य सवेश नाट्यगीत गायन स्पर्धा 2024” चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा सिंधुदुर्ग, रत्नागिरी व गोवा राज्य मर्यादित आहे. यात प्रथम पारितोषिक रोख रू 10,000/- व सन्माचिन्ह, व्दितीय पारितोषिक रोख रू 7,000/- व सन्मानचिन्ह , तृतीय पारितोषिक रोख रू 5,000/- व सन्माचिन्ह याशिवाय उत्तेजनार्थ म्हणून प्रत्येकी रू 2,000 ची दोन पारितोषिके दिली जातील.
स्पर्धेचे प्रवेश शुक्ल रू 200/- असून खालील अकाऊंट नंबर वर गूगल पे द्वारे भरावे.
• A/C Name – SHRI SADGURU SANGIT KALA VA SANSKRUTIK MANDAL .
• A/C NO. 141010110012318
• IFSC CODE – BKID0001410
• BR – SAWANTWADI
ही स्पर्धा 15 वर्षा वरील वयोगटासाठी असून दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. प्राथमिक फेरी ऑनलाईन ऑडिओ क्लिप द्वारे घेण्यात येईल. स्पर्धकांनी संपूर्ण गूगल फॉर्म भरून आपले ऑडियो रेकॉर्डिग दिनांक 7 फेब्रुवारी च्या आधी पाठवावे. या तारखेनंतर आलेला ऑडियो स्वीकारला जाणार नाही याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी. स्पर्धकांनी आपले ऑडियो रेकॉर्डिग व प्रवेश शुल्क भरलेल्याचा स्क्रिनशॉट “निरज मिलिंद भोसले :- 9011604509” या व्हॉटसॲप नंबर वर पाठवावे. आपला ऑडियो 3 ते 5 मिनिटांचा असावा, ऑडियोचा सुरुवातीला आपले नाव,शहराचे नाव व ऑडियो करतानाची तारीख नमूद करणे आवश्यक आहे.ऑनलाईन फेरीमध्ये निवड झालेल्या स्पर्धकांना 7 फेब्रुवारी नंतर वैयक्तिक कळविण्यात येईल, अंतिम फेरी शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी सायं 6 वाजता जनरल जगन्नाथराव शिवउद्यान सावंतवाडी (सावंतवाडी गार्डन) च्या प्रांगणात घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी श्री निलेश मेस्त्री :- 9423818770, श्री किशोर सावंत :- 9405925895 यांच्याशी संपर्क साधावा. सिंधुदूर्ग, रत्नागिरी व गोवा परिसरातील कलाकारांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
गूगल फॉर्म लिंक:-
https://forms.gle/ap2cpGjimmRuH7YA7