चेकपोस्टवर कडेकोट तपासणी करा
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सूचना : निवडणूक नोडल अधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवर कडक तपासणी करण्यात यावी. बेकायदेशीर पैशांची, मद्याची अथवा इतर वस्तूंची वाहतूक केली जात असल्यास त्वरित कारवाई करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी सूचना केल्या. वाहनांतून रोख रक्कम घेऊन जात असल्यास त्यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी. अधिकाऱ्यांनी चेकपोस्टवरून ये-जा करणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे तपासणी करावी. वाहन तपासणी करत असताना तपास नाक्यावर नियोजित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी ओळखपत्र घालणे सक्तीचे आहे, अशी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केली.
बेकायदेशीररित्या वाहतूक करण्यात येणाऱ्या रोख रकमेची अथवा मद्य ताब्यात घेतल्यास त्याची माहिती त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात यावी, असे जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी सांगितले. बेकायदेशीररित्या बॅनर लावले जात आहेत. त्यावर कारवाई करण्यात येत आहे. याबाबत तीन ठिकाणी भांडण झाले असून प्रकरणांची नोंद झाली आहे. याबाबत अतिदक्षता घेऊन नजर ठेवण्यात येत आहे. बेकायदेशीर बॅनरवर त्वरित कारवाई करण्यात यावी, असे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले. यावेळी मनपा आयुक्त पी. एन. लोकेश, कृषी खात्याचे संचालक शिवनगौडा पाटील, आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी महेश कोणी, जिल्हा पंचायत योजना अधिकारी गंगाधर दिवीटर, क्रीडा खात्याचे उपसंचालक बी. श्रीनिवास, तहसीलदार सिद्राय भोसगी, पशुसंगोपन खात्याचे उपसंचालक डॉ. राजीव कुलेर आदी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी चेकपोस्टवर कडेकोट तपासणी करा
चेकपोस्टवर कडेकोट तपासणी करा
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सूचना : निवडणूक नोडल अधिकाऱ्यांची बैठक बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवर कडक तपासणी करण्यात यावी. बेकायदेशीर पैशांची, मद्याची अथवा इतर वस्तूंची वाहतूक केली जात असल्यास त्वरित कारवाई करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत […]