सांगलीत दलित महासंघाचे राज्यअध्यक्ष उत्तम मोहिते यांची निर्घृण हत्या

सांगलीत दुहेरी हत्याकांडात दलित महासंघाचे नेता उत्तम मोहिते याना गारपीर चौकात वाढदिवस साजरा करताना धारधार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हत्याकांडातील मुख्य आरोपीचा जमावाने मारहाण केल्याने मृत्यू झाला आहे.

सांगलीत दलित महासंघाचे राज्यअध्यक्ष उत्तम मोहिते यांची निर्घृण हत्या

सांगलीत दलित महासंघाचे नेता उत्तम मोहिते याना गारपीर चौकात वाढदिवस साजरा करताना धारधार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हत्याकांडातील मुख्य आरोपीचा जमावाने मारहाण केल्याने मृत्यू झाला आहे. 

ALSO READ: अहिल्यानगर : कोपरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू

वृत्तानुसार, काल मयत नेता उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी  गारपारी चौकात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वाढदिवसाच्या समारंभात अनेक मान्यवर एकत्र झाले होते. या वेळी आरोपी देखील साथीदारांसह कार्यक्रमाला गेला होता. 

ALSO READ: मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे मुंबईत निधन

वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु झाल्यावर सर्वांनी जेवण केले नंतर शुभेच्छा देण्यासाठी मोहिते यांच्या कडे जात होते. या वेळी आरोपी आपल्या साथीदारांसह जेवण केल्यावर मोहिते यांना शुभेच्छा देण्यासाठी गेला आणि धारदार शस्त्राने सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सगळे हादरले. या हल्ल्यात मोहिते गंभीर जखमी झाले.

ALSO READ: वाघाच्या हल्ल्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. हे पाहून उत्तम मोहितेंच्या पुतण्याने आरोपीवर धारदार शस्त्राने हला केला. नंतर आरोपीला मोहिते यांच्या समर्थकांनी मारहाण केली या मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाला. ह्ल्लेच्या वेळी हल्लेखोर ड्रग्सच्या नशेत असल्याचे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

Edited By – Priya Dixit

 

Go to Source