कव्हर ड्राईव्ह-आम्हीच तुमचे मोठे भाऊ आहोत!

काल सामना सुरू होण्याअगोदर मला महाभारत आठवलं. ज्यावेळी कौरव-पांडवांच्या युद्धाअगोदर अर्जुन युद्ध करण्यास तयार नव्हता. त्यावेळी श्रीकृष्णाने गीतेतला सार सांगितला. त्यावेळी कुठे अर्जुन आपल्या स्वकीयांविऊद्ध लढण्यास तयार झाला. हा आशय मी तुम्हाला अशासाठी सांगतोय की काल भारतासमोर सुद्धा अशीच परिस्थिती उद्भवली होती. एक दोन नव्हे तब्बल सात खेळाडू भारतीय होते. जरी ते आपले असले तरी […]

कव्हर ड्राईव्ह-आम्हीच तुमचे मोठे भाऊ आहोत!

काल सामना सुरू होण्याअगोदर मला महाभारत आठवलं. ज्यावेळी कौरव-पांडवांच्या युद्धाअगोदर अर्जुन युद्ध करण्यास तयार नव्हता. त्यावेळी श्रीकृष्णाने गीतेतला सार सांगितला. त्यावेळी कुठे अर्जुन आपल्या स्वकीयांविऊद्ध लढण्यास तयार झाला. हा आशय मी तुम्हाला अशासाठी सांगतोय की काल भारतासमोर सुद्धा अशीच परिस्थिती उद्भवली होती. एक दोन नव्हे तब्बल सात खेळाडू भारतीय होते. जरी ते आपले असले तरी त्यांना कुठलीच दयामाया दाखवायची नाही, हे निश्चितच द्रविड गुऊजीनी रोहितला सांगितलेलं असावं. शेवटी म्हणतातच ना, प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं. असो. कालचा सामना हा दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण होता. विजेता संघ थेट सुपर एटचा दरवाजा खोलणार होता. आणि बघता बघता खुलजा सिम सिम म्हणत भारताने सुपरएटचा दरवाजा उघडला.
कालच्याही सामन्यात खेळपट्टीने आपल्या प्रेमाचा रंग दाखवलाच. या खेळपट्टीवर 110 ते 120 पर्यंत धावसंख्या या मैदानावर धावसंख्येचे प्रतीक बनू पाहतेय. काल पहिल्या षटकात अर्शदीपने अमेरिकेला निराश केलं. नितीश कुमार भारतीय संघाला अडचणीत आणणार असं वाटत असतानाच तोही झटपट बाद झाला. (काल परवा भारताच्या राजकारणात नितीश कुमार नावाच्या व्यक्तीने सुद्धा थोडी भीती निर्माण केली होती.) जलद शतकवीर कोरी अँडरसनने जोरदार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला खरा. पण तोही कमनशिबी ठरला. 110 या धावसंख्येचा पाठलाग करताना सौरभ नेत्रावळकरने खऱ्या अर्थाने जादुची कांडी फिरवली. ज्या खेळाडूंबरोबर भारतात लहानाचा मोठा झाला. रणजी करंडक सामन्यात मुंबईकडून खेळताना प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारली, त्याच मुंबईकर सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा यांच्या विरोधात त्याला लढावं लागलं. भारतात जन्म घेऊन तो कृतार्थ झाला. ज्या विराट कोहली, रोहित शर्मा यांना बाद करण्यासाठी गोलंदाज आसुसलेले असतात किंबहुना त्याच फलंदाजांना बाद करण्यासाठी वर्षानुवर्षे थांबलेले असतात, त्या रथी-महारथींना सौरभ नेत्रावळकरने मी तुमचाच ‘चेला’ आहे हे दाखवून दिले. पहिल्या दहा षटकात पराभवाचे गडद ढग दाटून आले होते खरे, परंतु सूर्यकुमार नावाच्या आकाशऊपी खेळीने ते कुठच्या कुठे गायब झाले. पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवने, माझ्यासाठी स्काय इज द लिमिट हे कठीण खेळपट्टीवरही दाखवून दिले.
असो. या विजयाने भारताने आपले स्थान पक्कं केलंय तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचं कंबरडेही मोडले गेले आहे. अमेरिका आयर्लंडविऊद्ध पराभूत झाला तर मात्र थोडीशी गुंतागुंत निश्चित होणार आहे. परंतु ज्या पद्धतीने अमेरिकेने पूर्ण स्पर्धेत खेळ केलाय, त्यावरून मात्र आयर्लंडविऊद्ध सामना त्यांना तेवढा कठीण जाणार नाही, हेही तेवढेच खरं. परंतु शेवटी हे क्रिकेट आहे. मागच्या विश्वचषक स्पर्धेत भलेभले राजकीय विश्लेषक तोंडघशी पडले होते, हे आपण विसरून चालणार नाही. एकंदरीत काय भारताने अमेरिकेला क्रिकेटमध्ये तरी दाखवून दिले की आम्हीच तुमचे मोठे भाऊ आहोत. तूर्तास तरी भारतीय संघाचे अभिनंदन. दुसरीकडे आज विंडीजने न्यूझीलंडला पराभूत करत्। आम्ही यजमान पुन्हा एकदा विश्वचषकाच्या स्पर्धेत आहोत, हे दाखवून दिले. स्पर्धेच्या पहिल्या 12 दिवसाचा विचार केला तर या स्पर्धेत सुऊवातीलाच श्रीलंका, पाकिस्तान, न्यूझीलंड हे संघ कमालीचे अडचणीत आले एवढे मात्र खरं.
विजय बागायतकर