पैसे घेणारे, देणारेही दोषी : सरदेसाई
मडगाव : नोकरीसाठी पैसे घेण्याच्या प्रकरणांचा आपल्याला मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याबाबतीत अनुभव नाही. त्यामुळे आपण त्यावर बोलू शकत नाही. मात्र जे उमेदवार नोकऱ्यांसाठी पात्र होते आणि ज्यांना पैसे घेऊन नोकऱ्या दिल्याने संधी डावलली गेली त्यांची आपल्याला काळजी आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले. या प्रकरणात पैसे देणारे व घेणारे हे दोघेही दोषी आहेत. सध्या जे प्रकरण चालू आहे ते लोकांकडून गोळा करून सुपूर्द केलेले पैसे परत मिळविण्यासाठी चाललेला खटाटोप असल्याचे दिसून येते. सरकारही या प्रकरणात गुंतलेले असल्याचे स्पष्ट होते. कारण या प्रकरणात गुंतलेल्यांची नावे देऊनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही, असे सरदेसाई पुढे म्हणाले. या प्रकरणात विरोधकांचाही वापर होत असल्यागत वाटते. जमीन घोटाळा प्रकरण घडल्यानंतर तपासासाठी केंद्रीय संस्था पुढे आल्या होत्या. या प्रकरणात तसे का घडलेले नाही, असा सवाल त्यांनी केला.
Home महत्वाची बातमी पैसे घेणारे, देणारेही दोषी : सरदेसाई
पैसे घेणारे, देणारेही दोषी : सरदेसाई
मडगाव : नोकरीसाठी पैसे घेण्याच्या प्रकरणांचा आपल्याला मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याबाबतीत अनुभव नाही. त्यामुळे आपण त्यावर बोलू शकत नाही. मात्र जे उमेदवार नोकऱ्यांसाठी पात्र होते आणि ज्यांना पैसे घेऊन नोकऱ्या दिल्याने संधी डावलली गेली त्यांची आपल्याला काळजी आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले. या प्रकरणात पैसे देणारे व घेणारे […]
