‘रेबिजमुक्त मुंबई’साठी 28 सप्टेंबरपासून लसीकरण
‘रेबिजमुक्त मुंबई’साठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. येत्या 28 सप्टेंबरपासून संपूर्ण मुंबई महानगरात व्यापक लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. रेबिजबाबत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे. प्राणिजन्य रोगांना आळा घालण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर लसीकरण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त (विशेष) किरण दिघावकर यांना पाऊलं उचलण्याचे निर्देश दिले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2030 पर्यंत भारत रेबीजमुक्त करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा आखला आहे. त्या अंतर्गत महानगरपालिकेने 2022 मध्ये मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प हाती घेतला. आता ‘वर्ल्ड वाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-मिशन रेबीज’ यांच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या वतीने 28 सप्टेंबरपासून भटक्या श्वानांच्या लसीकरणासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था, शाळा, बांधकाम स्थळे, सार्वजनिक संस्था इत्यादींपर्यंत पोहोचून प्राणीविषयक कल्याणकारी कायदे आणि नियमांसंदर्भात जनजागृती केली जात आहे. ऑगस्टमध्ये 65 शाळांमधील 13 हजार 332 विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. जनजागृतीच्या कामात 271 शिक्षक आणि 793 नागरिक सहभागी झाले आहेत. तक्रारी-विनंती नोंदवण्यासाठी ऑनलाईन सुविधा भटके तसेच पाळीव श्वानांचे लसीकरण, निर्बिजीकरण करणे तसेच यासंदर्भात तक्रारी किंवा विनंती नोंदवण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मायबीएमसी (MyBMC) मोबाईल ॲपवर किंवा https://vhd.mcgm.gov.in/register-grievance या लिंकवरून नागरिक विनंती किंवा तक्रार नोंदवू शकतात. भटक्या श्वानांची नसबंदी करण्याच्या उपक्रमाला गती देण्यासाठी आणखी काही प्राणी कल्याण संस्था नियुक्त करण्यात येतील, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले. हेही वाचातृतीयपंथींसाठी ‘केईएम’मध्ये पहिली ओपीडी
ठाणे : मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णात वाढ
Home महत्वाची बातमी ‘रेबिजमुक्त मुंबई’साठी 28 सप्टेंबरपासून लसीकरण
‘रेबिजमुक्त मुंबई’साठी 28 सप्टेंबरपासून लसीकरण
‘रेबिजमुक्त मुंबई’साठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. येत्या 28 सप्टेंबरपासून संपूर्ण मुंबई महानगरात व्यापक लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. रेबिजबाबत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे.
प्राणिजन्य रोगांना आळा घालण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर लसीकरण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त (विशेष) किरण दिघावकर यांना पाऊलं उचलण्याचे निर्देश दिले.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2030 पर्यंत भारत रेबीजमुक्त करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा आखला आहे. त्या अंतर्गत महानगरपालिकेने 2022 मध्ये मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प हाती घेतला.
आता ‘वर्ल्ड वाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-मिशन रेबीज’ यांच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या वतीने 28 सप्टेंबरपासून भटक्या श्वानांच्या लसीकरणासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्था, शाळा, बांधकाम स्थळे, सार्वजनिक संस्था इत्यादींपर्यंत पोहोचून प्राणीविषयक कल्याणकारी कायदे आणि नियमांसंदर्भात जनजागृती केली जात आहे. ऑगस्टमध्ये 65 शाळांमधील 13 हजार 332 विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. जनजागृतीच्या कामात 271 शिक्षक आणि 793 नागरिक सहभागी झाले आहेत.
तक्रारी-विनंती नोंदवण्यासाठी ऑनलाईन सुविधा
भटके तसेच पाळीव श्वानांचे लसीकरण, निर्बिजीकरण करणे तसेच यासंदर्भात तक्रारी किंवा विनंती नोंदवण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मायबीएमसी (MyBMC) मोबाईल ॲपवर किंवा https://vhd.mcgm.gov.in/register-grievance या लिंकवरून नागरिक विनंती किंवा तक्रार नोंदवू शकतात.
भटक्या श्वानांची नसबंदी करण्याच्या उपक्रमाला गती देण्यासाठी आणखी काही प्राणी कल्याण संस्था नियुक्त करण्यात येतील, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले. हेही वाचा
तृतीयपंथींसाठी ‘केईएम’मध्ये पहिली ओपीडीठाणे : मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णात वाढ