सोमवारपर्यंत भाजपचे उमेदवार होणार जाहीर
गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची माहिती : प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांसोबत स्वतंत्रपणे चर्चा
म्हापसा : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी बहुतांश मतदारसंघातील उमेदवारांची एकमताने निवड केली जात आहे. पुढील तीन ते चार दिवसांत उमेदवारी जाहीर केली जाईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली. प्रत्येक मतदारसंघात भाजपातर्फे एकमेव उमेदवार असेल याकडे भर देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. जिल्हा पंचायतीसाठी उत्तर गोव्यातील 25 जागांवर भाजपच्या उमेदवार निश्चितीसाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष नाईक यांच्या उपस्थितीत म्हापशातील पक्ष कार्यालयात गुऊवारी बैठक झाली.
यावेळी कोअर कमिटीचे सदस्य, संबंधित मतदारसंघातील आमदार, सरपंच, मंडळ अध्यक्ष, जिल्हा पंचायत सदस्य, ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. मतदारसंघनिहाय इच्छुकांनाही बैठकीला बोलावण्यात आले होते. प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांसोबत स्वतंत्रपणे चर्चा यावेळी करण्यात आली. आरोग्यमंत्री विश्वजित राणे, खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार प्रेमेंद्र शेट, दत्ता खोलकर, माजी आमदार दयानंद सोपटे, सिद्धार्थ कुंकळ्योकर, प्रेमानंद महांबरे, उत्तर गोवा अध्यक्ष दयानंद कारबोटकर आदींसह नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
निवडणूक समिती नावे निश्चित करणार
राज्य निवडणूक सदस्यांची बैठक अद्याप सुरू आहे. अद्याप कोणालाही जिल्हा पंचायत निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडण्यात आले नाही वा कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. निवडणूक समिती जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली.
Home महत्वाची बातमी सोमवारपर्यंत भाजपचे उमेदवार होणार जाहीर
सोमवारपर्यंत भाजपचे उमेदवार होणार जाहीर
गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची माहिती : प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांसोबत स्वतंत्रपणे चर्चा म्हापसा : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी बहुतांश मतदारसंघातील उमेदवारांची एकमताने निवड केली जात आहे. पुढील तीन ते चार दिवसांत उमेदवारी जाहीर केली जाईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली. प्रत्येक मतदारसंघात भाजपातर्फे एकमेव उमेदवार असेल याकडे भर देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. जिल्हा पंचायतीसाठी उत्तर गोव्यातील 25 जागांवर भाजपच्या उमेदवार निश्चितीसाठी मुख्यमंत्री […]
