मुंबईत दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केल्याने मृत्यू

मुंबईतील मालाडमध्ये एका दुचाकीस्वार तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आई-वडील आणि पत्नीसमोर ही घटना घडली आहे. पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली असून उर्वरितांचा शोध सुरूआहे. आपल्या मुलाला मारहाण होण्यापासून वाचवण्यासाठी आई …

मुंबईत दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केल्याने मृत्यू

मुंबईतील मालाडमध्ये एका दुचाकीस्वार तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आई-वडील आणि पत्नीसमोर ही घटना घडली आहे. पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली असून उर्वरितांचा शोध सुरूआहे. आपल्या मुलाला मारहाण होण्यापासून वाचवण्यासाठी आई त्याच्या अंगावर पडली. पण क्रूरांची मने वितळली नाहीत. काही वेळातच आरोपींनी तरुणाचा जीव घेतला.

 

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई मधील मालाड येथे  एका 28 वर्षीय मोटारसायकलस्वार तरूणाला रस्त्यावरील रागाच्या भरात एका ऑटोरिक्षा चालकाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. त्याचा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी ऑटोचालकासह नऊ आरोपींना अटक केली आहे. इतरांचा शोध सुरू आहे.

 

तरुणाच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे कोणीही ऐकून घेतले नाही.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दफ्तरी रोडवर पुष्पा पार्कजवळ शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. ऑटोचालक याने मोटारसायकलस्वाराला ओव्हरटेक करताना जोरदार कट मारला. यावरून ऑटोचालक व मोटारसायकलस्वार यांच्यात वाद झाला. काही वेळातच वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. व मोटरसायकलस्वराला बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला तसेच रुग्णालयात त्याच्या मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

 

या घटनेनंतर आरोपी रिक्षाचालकासह इतरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रिक्षाचालकाला रविवारी अटक करण्यात आली तर दुसरा फरार होता, अशी माहिती दिंडोशी पोलीस स्टेशनमधील अधिकारींनी दिली आहे. पोलिसांनी रात्री  आणखी आठ आरोपींना अटक केली आहे.

Edited By- Dhanashri Naik

Go to Source