बदलापूर लैंगिक छळ प्रकरण : आरोपींवर बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा, मुख्यमंत्री शिंदेंचे पोलिसांना निर्देश

ठाण्यातील बदलापूरच्या एका शाळेत दोन चिमुकल्यांचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे.

बदलापूर लैंगिक छळ प्रकरण : आरोपींवर बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा, मुख्यमंत्री शिंदेंचे पोलिसांना निर्देश

ठाण्यातील बदलापूरच्या एका शाळेत दोन चिमुकल्यांचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने केला जाईल आणि यासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात येईल. 

 

ते म्हणाले, मी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात बलात्काराचा प्रयत्न आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. 

लैंगिक शोषणाच्या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बदलापूरच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या शेकडो पालकांनी मंगळवारी सकाळपासून बदलापूर रेल्वे स्थानकावर ‘रेल रोको’ आंदोलन केले. आंदोलनामुळे उपनगरीय गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

रेल्वे रोकोमुळे लोकल गाड्यांचे कामकाज विस्कळीत होत असल्याने पालकांनी संयम बाळगण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. 

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर 12 तासांनंतर देखील कोणतीही दखल न घेतल्याने एका पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. शाळेला देखील नोटीस बजावली आहे. मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे.

शाळेच्या अटेंडंटला शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींशी शाळेच्या स्वछतागृहात लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.  

तक्रारीत आरोपीने मुलींशी शाळेच्या स्वछतागृहात लैंगिक अत्याचार केला. मुलींनी आपल्या पालकांना घडलेले सांगितले.नंतर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. 

Edited by – Priya Dixit   

 

 

 

Go to Source