अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
राऊज ॲव्हेन्यू कोर्टाचा आदेश : पंतप्रधान मोदी जे करत आहेत ते योग्य नाही : अरविंद केजरीवाल
ईडीने 21 मार्च रोजी केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक केली होती. 28 मार्च रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीत अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांच्या 7 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने त्यांना 1 एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. आता न्यायालयाने केजरीवाल यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कथित मद्य घोटाळाप्रकरणात ईडीने कारवाई करून अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज राऊज ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीने कोठडी ठोठावली आहे. ED ने न्यायालयीन कोठडी मागितल्यानंतर कोर्टाने हा आदेश दिला. त्यामुळे आता 15 एप्रिलपर्यंत ते तिहार जेलमध्ये असतील. 28 मार्च रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीत अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांच्या 7 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने त्यांना 1 एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने आज अरविंद केजरीवाल यांची कोठडी मागितली नाही आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची विनंती केली केजरीवाल यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी ईडीने केली, जी न्यायालयाने मान्य केली. केजरीवाल यांनी त्यांच्या डिजिटल डिव्हाइसचे पासवर्ड दिलेले नाहीत. तसेच त्यांचे वागणे असहकाराचे आहे. कोणत्याही प्रश्नाचे ते योग्य उत्तर देत नाहीयेत, फक्त उडवाउडवीची उत्तरं देत आहेत, असे ईडीने नमूद केले. यापूर्वी, गुरुवारी म्हणजेच 28 मार्च रोजी न्यायालयाने दिल्लीच्या मुख्यमंत्री असलेल्या केजरीवाल यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली होती. त्यावेळी त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवालही कोर्टात हजर होत्या. आज न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठोठावल्यानंतर केजरीवाल यांची तिहार तुरूंगात रवानगी होईल. त्यांच्यासाठी कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात येणार.
Home महत्वाची बातमी अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
राऊज ॲव्हेन्यू कोर्टाचा आदेश : पंतप्रधान मोदी जे करत आहेत ते योग्य नाही : अरविंद केजरीवाल ईडीने 21 मार्च रोजी केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक केली होती. 28 मार्च रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीत अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांच्या 7 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने त्यांना 1 एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. यानंतर आज […]