कुंभारी सहपरिसरात मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करा

अर्चना नाथाभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण : वन विभागाकडून सापळा लावण्याच्या आश्वासनंतर उपोषण मागे जत, प्रतिनिधी जत तालुक्यातील कुंभारी परिसरात गेले सात दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शेतकरी व गावातील नागरिक बिबट्याच्या धास्तीने भयभीत आहेत. शिवाय, एक शेळी, एक बोकड, या बिबट्याचा शिकार झालेले आहेत. त्यामुळे बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा, या मागणीसाठी कुंभारी सह […]

कुंभारी सहपरिसरात मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करा

अर्चना नाथाभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण : वन विभागाकडून सापळा लावण्याच्या आश्वासनंतर उपोषण मागे
जत, प्रतिनिधी

जत तालुक्यातील कुंभारी परिसरात गेले सात दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शेतकरी व गावातील नागरिक बिबट्याच्या धास्तीने भयभीत आहेत. शिवाय, एक शेळी, एक बोकड, या बिबट्याचा शिकार झालेले आहेत. त्यामुळे बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा, या मागणीसाठी कुंभारी सह परिसरातील नागरिकांनी माजी पंचायत समिती सदस्य अर्चना नाथाभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
वन विभागाला लेखी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी नाथाभाऊ वसंत पाटील, कुंभारी गावच्या सरपंच ज्योती कृष्णा जाधव, प्रतापूर सरपंच तुकाराम खांडेकर, धनाजी शिंदे, शिवाजी माळी, कृष्णा जाधव, नितीन सूर्यवंशी, संतोष माळी, दिलीप यादव, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी वन विभागाचे वनक्षेत्रपाल प्रवीण पाटील यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. वरिष्ठ कार्यालयास कळवून तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करू, असे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
त्यावेळी नाथाभाऊ पाटील म्हणाले की, कुंभारी सह परिसरातील लोकांना बिबट्याच्या भीतीने घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. सध्या गाव व परिसरात बिबट्याच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विकास दादू माळी हे गुरे राखताना त्यांच्यासमोर त्यांच्या कळपातील शेळी बिबट्याने नेली. आणखी एका शेतकऱ्याची शेळी बिबट्याने पळून नेली. आता वन विभाग माणसांवर हल्ला करण्याची वाट बघत आहे का?, असा सवाल उपस्थित करत वन विभागाला लेखी कळवून देखील यावर कोणतीही कारवाई वन विभागाकडून केली गेली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिकांना भयामुक्त करावे.