INDvsENG Test : पोपचे दीड शतक, इंग्लंडची सातवी विकेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी (दि.28) सकाळी 9.30 वाजता सुरू झाला. इंग्लंडने आपल्या दुस-या डावात 7 बाद 346 धावा केल्या आहेत. त्यांच्याकडे 156 धावांची आघाडी मिळवली आहे. इंग्लंडची सातवी विकेट इंग्लंडची सातवी विकेट 339 धावांवर … The post INDvsENG Test : पोपचे दीड शतक, इंग्लंडची सातवी विकेट appeared first on पुढारी.

INDvsENG Test : पोपचे दीड शतक, इंग्लंडची सातवी विकेट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी (दि.28) सकाळी 9.30 वाजता सुरू झाला. इंग्लंडने आपल्या दुस-या डावात 7 बाद 346 धावा केल्या आहेत. त्यांच्याकडे 156 धावांची आघाडी मिळवली आहे.
इंग्लंडची सातवी विकेट
इंग्लंडची सातवी विकेट 339 धावांवर पडली. रेहान अहमद 53 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहने त्याला केएस भरतकरवी विकेटच्या मागे झेलबाद केले.
पोप-रेहान अहमदची अर्धशतकी भागिदारी
चौथ्या दिवसाच्या तिसऱ्या षटकात लेगस्पिनर रेहान अहमदने शतकवीर ओली पोपसोबत अर्धशतक भागीदारी पूर्ण केली. जडेजाच्या विरुद्ध ३६ धावा करत त्याने हे यश मिळवले. रेहानने चौथ्या दिवशी 16 धावा करत आपला डाव सुरू ठेवला.
ओली पोपचे दीड शतक
ओली पोपने चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या षटकात 150 धावा पूर्ण केल्या. जसप्रीत बुमराहविरुद्ध एकेरी धाव घेऊन त्याने 212 चेंडूत ही कामगिरी केली.
चौथ्या दिवशी इंग्लंडच्या डावाला सुरुवात
चौथ्या दिवशी इंग्लंडने त्यांचा दुसरा डाव 6 बाद 316 धावसंख्येपासून सुरू केला.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लिश संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली. ओली पोपच्या शतकाच्या जोरावर पाहुण्या संघाने 126 धावांची आघाडी घेतली. चौथ्या दिवसाचे पहिले सत्र जिंकण्यात इंग्लंडला यश आले, तर भारतासाठी कठीण होईल. तिसऱ्या दिवसाच्या चहापानापर्यंत भारत ड्रायव्हिंग सीटवर होता, मात्र तिसऱ्या सत्रात इंग्लंडने 144 धावा करत भारतासमोर अडचणी निर्माण केल्या. ऑली पोप नाबाद 148 धावांसह क्रीजवर आहे. चौथ्या दिवशी प्रथम पोपची शिकार करण्याची भारताची योजना असेल. जर टीम इंडियाने पाहुण्यांचा पहिल्या तासात ऑलआऊट केला तर त्यांना मोठे लक्ष्य मिळण्याची आशा कमी आहे.
Latest Marathi News INDvsENG Test : पोपचे दीड शतक, इंग्लंडची सातवी विकेट Brought to You By : Bharat Live News Media.