कुलभूषण जाधव यांच्या अपहरणात ‘जेएए’चा हात
Bharat Live News Media वृत्तसेवा :
इराणच्या वतीने पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील जैश अल अदल (जेएए) या दहशतवादी संघटनेच्या तळावर हवाई हल्ला करण्यात आला. जेएए या सुन्नीपंथीय संघटनेच्या घातपाती कारवाया आणि ठावठिकाण्याबाबत थोडक्यात माहिती…
जेएएचा म्होरक्या अब्दुल रहीम मुल्लाह जादेह आहे. त्याच्या ठावठिकाण्याबद्दल कुणालाही माहिती नाही. त्यांचे छायाचित्रही अद्याप उपलब्ध झालेले नाही.
इराण सीमेला लागून असलेल्या पंजगूर या ठिकाणी इराणने हवाई हल्ला केला. बलुचिस्तानातील कोह-सब्ज या ठिकाणी जेएएच्या दहशतवाद्यांचा अड्डा आहे.
जैश अल अदलचा अर्थ आर्मी फॉर जस्टीस आहे. सुन्नीपंथीय दहशतवादी संघटना आहे. पाकिस्तान आणि इराणच्या पहाडी भागात या संघटनेच्या दहशतवाद्यांनी आश्रय घेतला आहे.
बलुचिस्तान प्रांत आणि हिंदी महासागराला लागून असलेल्या इराणकच्या नैऋत्यकडील सिस्तान आणि बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी या दहशतवादी संघटनेचा लढा सुरू असल्याचे मानले जाते.
2013 मध्ये इराणच्या सीमा सुरक्षा दलावर या संघटनेने हल्ला करून इराणच्या सैनिकांचे अपहरण केले होते. डिसेंबरमध्ये इराणच्या रस्क शहरातील पोलिस ठाण्यावर केलेल्या हल्ल्यात 11 पोलिसांचा मृत्यू झाला होता.
बलुचिस्तनातील जुनदल्लाह या दहशतवादी संघटनेची दुसरी शाखा म्हणूनही जेएएची ओळख आहे. 2012 मध्ये या संघटनेने जेएए असे नाव ठेवले. 4 नोव्हेंबर 2010 रोजी अब्दुल मलिक रेगी याने स्थापन केलेल्या जुनदल्लाहवर अमेरिकेने बंदी घातली. इराणने रेगी याचा खात्मा केला.
यानंतर जेएएने दहशतवादी कारवायात वाढ केली. या संघटनेवर बंदी घालण्यासाठी अमेरिकेच्या हालचाली सुरू आहेत.
पिपल्स रेझिस्टंटस् ऑफ इराण म्हणूनही जेएए सक्रिय आहे. इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात जेएएचे दहशतवादी सक्रिय आहेत.
The post कुलभूषण जाधव यांच्या अपहरणात ‘जेएए’चा हात appeared first on Bharat Live News Media.