फायनलपूर्वी युवराज सिंगचे विराटबाबत मोठे विधान, म्‍हणाला…

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आपल्‍या अविस्‍मरणीय खेळीने भारताचा स्‍टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्‍या वनडेतील ४९ शतकांचा विक्रम मोडित काढला. या कामगिरीमुळे माजी क्रिकेटपटूंकडून विराटवर स्‍तुतीसुमनांचा वर्षाव होत आहे. (Virat Kohli and Yuvraj Singh) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवार, १९ नोव्‍हेंबर २०२३ रोजी अंतिम सामन्‍यात ( World Cup Final ) … The post फायनलपूर्वी युवराज सिंगचे विराटबाबत मोठे विधान, म्‍हणाला… appeared first on पुढारी.

फायनलपूर्वी युवराज सिंगचे विराटबाबत मोठे विधान, म्‍हणाला…

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आपल्‍या अविस्‍मरणीय खेळीने भारताचा स्‍टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्‍या वनडेतील ४९ शतकांचा विक्रम मोडित काढला. या कामगिरीमुळे माजी क्रिकेटपटूंकडून विराटवर स्‍तुतीसुमनांचा वर्षाव होत आहे. (Virat Kohli and Yuvraj Singh)
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवार, १९ नोव्‍हेंबर २०२३ रोजी अंतिम सामन्‍यात ( World Cup Final ) भारताचा मुकाबला ऑस्‍ट्रेलियाची होणार आहे. यंदाच्‍या स्‍पर्धेत दोन्‍ही संघांची कामगिरी अविस्‍मरणीय झाली आहे. भारताने सलग 10 सामने जिंकत स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ आहे तर ऑस्ट्रेलियाला दोन पराभवांचा सामना केला आहे.
Virat Kohli and Yuvraj Singh : काय म्‍हणाला युवराज सिंग?
यू ट्यूब चॅनल ‘स्‍पोर्टस टॉक’शी बोलताना भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) म्‍हणाला की, भारतीय क्रिकेट संघ यापूर्वी कधीच एवढा संतुलित पाहिलेला नाही. संघात आठ ते दहा खेळाडूंकडे सामना जिंकून देण्‍याची क्षमता असणारे आहेत. भारतीय संघात ५ फलंदाज आहेत. १९९९ ते २००७ या काळात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ असा क्रिकेट संघ जसा होता तसा आताचा भारतीय क्रिकेट संघ आहे.
विराट मोडेल सचिन तेंडुलकरच्‍या १०० शतकांचा विक्रम
विराट कोहली सध्‍या जबरदस्‍त कामगिरी करत आहे. ज्या वेगाने तो सध्‍या फलंदाजी करत आहे त्या वेगाने काहीही शक्य होऊ शकते. तो सचिन तेंडुलकर याचा १०० शतकांचा विक्रमही मोडीत काढू शकतो. वन-डे क्रिकेटमध्‍ये तो अधिक शतके करू शकतो. त्‍याने वनडे क्रिकेटमध्‍ये ७१ अर्धशतके आणि ५० शतकांचा विक्रम त्‍याच्‍या नावावर आहेत. ही कामगिरी अचंबित करणारी आहे.
विराट कोहलीने उपांत्‍य फेरीत न्‍यूझीलंडविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरच्या ४९ वनडे शतकांचा विक्रम मोडित काढला होता. सध्‍या विराटच्‍या नावावर एकूण ८० शतके आहेत. विराट कोहली 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक ७११ धावा करणारा फलंदाज आहे.
हेही वाचा : 

World Cup Final मध्ये परफॉर्म करणार Dua Lipa, शुभमन गिल म्हणाला…
IND vs AUS Cricket World Cup final | क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! मध्य रेल्वेकडून मुंबई ते अहमदाबाद विशेष ट्रेन
World Cup 2023 Final | विराट, रोहित नाही….पॅट कमिन्स म्हणतो, ‘हा’ खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी धोकादायक!

 
 
The post फायनलपूर्वी युवराज सिंगचे विराटबाबत मोठे विधान, म्‍हणाला… appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आपल्‍या अविस्‍मरणीय खेळीने भारताचा स्‍टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्‍या वनडेतील ४९ शतकांचा विक्रम मोडित काढला. या कामगिरीमुळे माजी क्रिकेटपटूंकडून विराटवर स्‍तुतीसुमनांचा वर्षाव होत आहे. (Virat Kohli and Yuvraj Singh) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवार, १९ नोव्‍हेंबर २०२३ रोजी अंतिम सामन्‍यात ( World Cup Final ) …

The post फायनलपूर्वी युवराज सिंगचे विराटबाबत मोठे विधान, म्‍हणाला… appeared first on पुढारी.

Go to Source