हार्दिक पंड्या द. आफ्रिकाविरूद्धच्या मालिकेतूनही ‘आऊट’

पुढारी ऑनलाईन डेस्क : वन-डे वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या जखमी झाल्यामुळे भारताला मोठा धक्का बसला. सामन्यात जखमी झाल्यामुळे हार्दिकला वर्ल्ड कपच्या उर्वरित सामन्यांना मुकावे लागले होते. यानंतर हार्दिक ऑस्ट्रेलियाविरूद्धची तीन टी-20 सामन्यांची मालिका देखील खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, आता हार्दिक बाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.  (Hardik Pandya Injury) वर्ल्ड … The post हार्दिक पंड्या द. आफ्रिकाविरूद्धच्या मालिकेतूनही ‘आऊट’ appeared first on पुढारी.
हार्दिक पंड्या द. आफ्रिकाविरूद्धच्या मालिकेतूनही ‘आऊट’


पुढारी ऑनलाईन डेस्क : वन-डे वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या जखमी झाल्यामुळे भारताला मोठा धक्का बसला. सामन्यात जखमी झाल्यामुळे हार्दिकला वर्ल्ड कपच्या उर्वरित सामन्यांना मुकावे लागले होते. यानंतर हार्दिक ऑस्ट्रेलियाविरूद्धची तीन टी-20 सामन्यांची मालिका देखील खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, आता हार्दिक बाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.  (Hardik Pandya Injury)
वर्ल्ड कपमधील बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या स्वत:च्या गोलंदाजीवर मारलेला सरळ फटका आडवण्याच्या प्रयत्नात जखमी झाला होता. त्यावेळी त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. दुखापत मोठी असल्यामुळे तो आपली ओव्हर पूर्ण न करताच मैदानातून बाहेर गेला. त्याची उर्वरित ओव्हर विराटने पुर्ण केली. यानंतर तो वर्ल्डकपच्या बाद फेरीत दुखापतीतून सावरून ऑस्ट्रेलियाविरूद्धच्य सामन्यात पुनरागमन करेल असे चाहत्यांना वाटत होते. मात्र तो अजूनही तंदुरूस्त झालेला नाही. (Hardik Pandya Injury)
हार्दिक पांड्याची दुखापत ही भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. हार्दिक संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहे. त्याची कामिगिरी भारतासाठी नेहमी निर्णायक ठरली आहे. गोलंदाजीने विकेट घेण्यात तो पटाईत आहे. यासह फलंदाजीमध्ये आक्रमक खेळी फलंदाजी सामन्यात परिणामकारक ठरतो. अजूनही पुर्णपणे फीट न झाल्यामुळे हार्दिकची उणीव टीम इंडियाला आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणवणार आहे.

🚨 Update 🚨
Hardik Pandya’s injury is being assessed at the moment and he is being taken for scans.
Follow the match ▶️ https://t.co/GpxgVtP2fb#CWC23 | #TeamIndia | #INDvBAN | #MeninBlue pic.twitter.com/wuKl75S1Lu
— BCCI (@BCCI) October 19, 2023

हेही वाचा :

India vs Kuwait : भारतीय फुटबॉल संघाचा कुवेतवर शानदार विजय
OBC Reservation : ओबींसींवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल : गोपीचंद पडळकर
Gyanvapi Mosque: ज्ञानवापी सर्वेक्षण अहवालासाठी ‘ASI’ने १५ दिवसांची मुदतवाढ मागितली

The post हार्दिक पंड्या द. आफ्रिकाविरूद्धच्या मालिकेतूनही ‘आऊट’ appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : वन-डे वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या जखमी झाल्यामुळे भारताला मोठा धक्का बसला. सामन्यात जखमी झाल्यामुळे हार्दिकला वर्ल्ड कपच्या उर्वरित सामन्यांना मुकावे लागले होते. यानंतर हार्दिक ऑस्ट्रेलियाविरूद्धची तीन टी-20 सामन्यांची मालिका देखील खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, आता हार्दिक बाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.  (Hardik Pandya Injury) वर्ल्ड …

The post हार्दिक पंड्या द. आफ्रिकाविरूद्धच्या मालिकेतूनही ‘आऊट’ appeared first on पुढारी.

Go to Source