विदर्भाने काँग्रेसला संकटकाळात नेहमी साथ दिली: विजय वडेट्टीवार

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : काँग्रेस स्थापना दिनानिमित्त गुरूवारी (दि.२८) संपूर्ण देशातून काँग्रेस कार्यकर्ते नागपुरात येणार आहेत. यावेळी आयोजित महारॅली सभा यशस्वी होईल, अशी माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. आज (दि.२५) दिघोरीतील सभास्थळाची वडेट्टीवार यांनी पाहणी केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. vijay wadettiwar
नागपुरात १९२० मध्ये स्थापना दिवस सभा झाली होती. त्यानंतर आता १०३ वर्षांनी सभा होत आहे. काँग्रेस अडचणीत असताना विदर्भाने नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी वर्धापन दिन साजरा करायला संधी दिली. १० लाख लोक देशभरातून येतील, असे आमचे नियोजन सुरू आहे. विदर्भ, मराठवाडामधून लोक मोठ्या प्रमाणात येणार आहेत. तेलंगणा, छत्तीसगढमधूनही काँग्रेसजन सहभागी होणार असल्याने ही सभा ऐतिहासिक होईल, देशाला दिशा मिळेल. vijay wadettiwar
लोकसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना आम्ही निवडणूक मोडवर आलो आहेत. लोकसभा निवडणुकीला फार कमी वेळ आहे, अशा स्थितीत या सभेच्या माध्यमातून देशात संदेश देत आहोत. है तयार हम…
vijay wadettiwar : हुकुमशाही विरोधात
लोकशाही वाचवण्यासाठी, बेरोजगार तरुण, शेतकऱ्यांसाठी ‘है तयार हम’ अशी ही टॅगलाईन असून राजकीय दृष्ट्या ही सभा महत्वाची असेल. विदर्भातून काँग्रेला ताकद मिळेल, त्यासाठी या सभेचे महत्व राहील. रामलल्ला संदर्भात उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर देव सगळ्यांचा असतो, कोणी बाजार मांडतो, कोणी श्रद्धा राखतो, आम्ही श्रद्धा ठेवणारे आहोत, यावर वडेट्टीवार यांनी भर दिला.
वंचित – काँग्रेसची आघाडी झाल्यास महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाची संधी
लोकांची घर फोडायची आणि स्वतःचं घर सजवायचं. लोकं हेच स्वीकारणार नाही. निवडणुकीच्या माध्यमातून या सगळ्याचे उत्तर जनता महायुतीला देईल. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी काय म्हटले, यावर मी उत्तर देणार नाही. प्रकाश आंबेडकर यांची सभा नागपुरात होत आहे. ती चांगली व्हावी, अशी आमची इच्छा आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडी व्हावी, अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आघाडी झाल्यास महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाची खूप मोठी संधी आहे. जिल्हा परिषदेत भाजपचा दारुण पराभव झाला. ग्रामीण भागात सुनील केदार यांनी भाजपला टिकू दिले नाही. त्यामुळे त्यांना संपवण्याचे काम करत हा बदला घेण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
हेही वाचा
बळीराजाला कर्जमुक्त करा, वीज बील माफ करा; विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी
फुटीर गटामध्ये लढण्याची क्षमता नाही; विजय वडेट्टीवार यांची टीका
धनगर आरक्षणाचा प्रश्न सरकार सोडवू शकत नाही : विजय वडेट्टीवार
Latest Marathi News विदर्भाने काँग्रेसला संकटकाळात नेहमी साथ दिली: विजय वडेट्टीवार Brought to You By : Bharat Live News Media.
