मुक्ता-सागर केळवणाला अलिबागच्या कोळीवाड्यात; पाहा व्हिडिओज्

पुढारी ऑनलाईन डेस्क :  गेल्या कित्येक दिवसांपासून उत्सुकता असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील त्या मुक्ता-सागरचा विवाहसोहळा येत्या आठवड्यात पार पडणार आहे. मेहंदी, संगीत आणि हळद तर थाटात पार पडली आहे. आता उत्सुकता आहे ती लग्नाची. गोखले आणि कोळी कुटुंबाने लग्नाची जय्यत तयारी केली असून विवाहसोहळ्यात स्टार प्रवाह परिवारातले खास पाहुणेही येणार आहेत. आता मुक्ता-सागरचे केळवण मुंबईतील … The post मुक्ता-सागर केळवणाला अलिबागच्या कोळीवाड्यात; पाहा व्हिडिओज् appeared first on पुढारी.

मुक्ता-सागर केळवणाला अलिबागच्या कोळीवाड्यात; पाहा व्हिडिओज्

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :  गेल्या कित्येक दिवसांपासून उत्सुकता असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील त्या मुक्ता-सागरचा विवाहसोहळा येत्या आठवड्यात पार पडणार आहे. मेहंदी, संगीत आणि हळद तर थाटात पार पडली आहे. आता उत्सुकता आहे ती लग्नाची. गोखले आणि कोळी कुटुंबाने लग्नाची जय्यत तयारी केली असून विवाहसोहळ्यात स्टार प्रवाह परिवारातले खास पाहुणेही येणार आहेत. आता मुक्ता-सागरचे केळवण मुंबईतील अलिबागच्या कोळीवाड्यात साजरा केला आहे.
संबंधित बातम्या 

Parineeti Chopra : लग्नाच्या दोन महिन्यानंतर परिणीती- राघव हनीमूनला; म्हणाली, ‘मी आयुष्यभर…’
Gautami Patil : गौतमी पाटीलचा “इश्काचा मौका”, नवा व्हिडिओ पाहाच
Alia Bhatt : जणू बार्बी डॉलचं; आलिया – रणबीरनं दाखवला ‘राहा’ चा चेहरा (VIDEO)

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत लग्नाची धामधूम पाहायला मिळणार आहे. पण, पडद्यामागेही मुक्ता-सागरच्या लग्नासाठी प्रेक्षकांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. अलिबागमधल्या कोळीवाड्यात नुकताच मुक्ता-सागरचं केळवण पारंपरिक पद्धतीने पार पडलं. सोशल मीडिया स्टार नलिनी मुंबईकर यांनी मुक्ता, सागर, इंद्रा आणि चिमुकल्या सईला सुग्रास जेवणाची मेजवानी दिली. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतल्या कलाकारांच्या स्वागतासाठी संपूर्ण कोळीवाडा सजला होता. कोळी गाण्यांच्या ठेक्यावर कलाकारांचं स्वागत झालं आणि रंगला सुग्रास केळवणाचा बेत. अलिबागकरांचं प्रेम पाहून मुक्ता-सागर भारावून गेले.

केळवणाच्या या खास दिवशी मुक्ताने खास उखाणा घेतला आहे. ‘नलिनी काकुंनी आमंत्रण देऊन ‘प्रेमाची गोष्ट’ केली मोठी. स्टार प्रवाहच्या साक्षीने भरली मुक्ताची खणा नारळाने ओटी. अलिबागकरांनी घातलाय सागर-मुक्ताच्या केळवणाचा घाट. पहाण्यासाठी सई सुद्धा पोहोचली धरुन इंद्रा आजीचा हात.’ मुक्ताच्या या उखाण्याने केळवणाच्या कार्यक्रमाची सांगता झाली आणि कलाकारांनी पुन्हा मुंबई गाठली. यामुळे या मालिकेसाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.

 

View this post on Instagram

 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

View this post on Instagram

 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

View this post on Instagram

 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

View this post on Instagram

 
A post shared by MARATHI आपला KATTA°™️ (@marathiaaplakatta_official)

Latest Marathi News मुक्ता-सागर केळवणाला अलिबागच्या कोळीवाड्यात; पाहा व्हिडिओज् Brought to You By : Bharat Live News Media.