Market update : बाजारात मिरचीचा ‘ठसका’ ; भेंडी, वांगी, गवार, लसूण तेजीत

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  थंडीचा कडाका वाढल्याचा फटका कमी तिखट असलेल्या मिरचीच्या उत्पादनाला बसला आहे. त्यामुळे मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. साध्या मिरचीची प्रतिकिलो 100 रुपयांहून अधिक दराने विक्री झाली. पालेभाज्या स्वस्त बाजारात भेंडी, वांगी, गवार आणि लसूनाचे दरही तेजीत आहेत. मात्र, पालेभाज्या स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. हवामानात आर्दता वाढल्याने मिरचीच्या पिकाचे … The post Market update : बाजारात मिरचीचा ‘ठसका’ ; भेंडी, वांगी, गवार, लसूण तेजीत appeared first on पुढारी.

Market update : बाजारात मिरचीचा ‘ठसका’ ; भेंडी, वांगी, गवार, लसूण तेजीत

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा :  थंडीचा कडाका वाढल्याचा फटका कमी तिखट असलेल्या मिरचीच्या उत्पादनाला बसला आहे. त्यामुळे मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. साध्या मिरचीची प्रतिकिलो 100 रुपयांहून अधिक दराने विक्री झाली.
पालेभाज्या स्वस्त
बाजारात भेंडी, वांगी, गवार आणि लसूनाचे दरही तेजीत आहेत. मात्र, पालेभाज्या स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. हवामानात आर्दता वाढल्याने मिरचीच्या पिकाचे नुकसान होत आहे. कमी तिखट असणारी मिरचीसुद्धा लवंगी मिरची प्रमाणे नाशवंत आहे. हवामानात वाढलेल्या आद्रतेने साध्या मिरचीच्या उत्पन्नावर परिणाम होऊन पिकांची आवक घटली आहे. परिणामी शहरातील मोशी उपबाजार, चिंचवड, आकुर्डी तसेच पिंपरी येथील लाल बहादुर शास्त्री भाजी मंडईतील किरकोळ बाजारात साधी मिरची प्रतिकिलो 100 रूपयाहून अधिक दराने विक्री होत आहे. त्यासह भेंडी, वांगी, गवार आदींचे दरही तेजीत आहेत. परंतु, कोथिंबीर, पालक, मेथीची जुळी प्रत्येकी वीस रूपये दराने विक्री होत आहे.
मोशी उपबाजारातील घाऊक दर ः (प्रतिकिलो)
वांगी 50 ते 60, शेवगा 70 ते 80, भेंडी 65 ते 70, गवार 70 ते 90, काकडी 15 ते 20, कांदा 15 ते 20, बटाटा 12 ते 15, टोमॅटो 10 ते 12, आले 65 ते 70, लसून 150 ते 160, मटार 30 ते 35 रूपये प्रतिकिलो दराने विक्री झाली.
मोशी उपबाजारातील आवक ः (क्विंटल)
कांदा 377, बटाटा 605, आले 43, लसून 8, गाजर 264, गवार 26, शेवगा 10, गवार 26, हिरवी मिरची 136, टोमॅटो 433, काकडी 151, भेंडी 66. मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकुण 41960 गड्डी, फळे 238 क्विंटल आणि फळभाज्यांची आवक 3345 क्विंटल एवढी आवक झाली होती.
Latest Marathi News Market update : बाजारात मिरचीचा ‘ठसका’ ; भेंडी, वांगी, गवार, लसूण तेजीत Brought to You By : Bharat Live News Media.