ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे, टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDW vs AUSW ODI & T20 : बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची सोमवारी घोषणा केली. दोन्ही संघांचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. तर स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. श्रेयंका पाटील, सायका इशाक, मन्नत कश्यप आणि तितास साधू यांना प्रथमच वनडे संघात संधी मिळाली आहे. तर स्नेह राणा … The post ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे, टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा appeared first on पुढारी.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे, टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : INDW vs AUSW ODI & T20 : बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची सोमवारी घोषणा केली. दोन्ही संघांचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. तर स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. श्रेयंका पाटील, सायका इशाक, मन्नत कश्यप आणि तितास साधू यांना प्रथमच वनडे संघात संधी मिळाली आहे. तर स्नेह राणा आणि हरलीन देओल फक्त एकदिवसीय संघात आहेत. कनिका आहुजा आणि मिनू मणी यांची टी-20 साठी निवड झाली आहे. वानखेडे स्टेडियमवर 28 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान एकदिवसीय, तर नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर 5 ते 9 जानेवारी दरम्यान टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.
भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात आहे. त्यांनी रविवारी (24 डिसेंबर) कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला. यापूर्वी टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव केला होता. आता हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघ ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतही मात देण्यासाठी सज्ज झाला आहे.
ऋचा, रेणुकाचे वनडे संघात पुनरागमन
यष्टिरक्षक फलंदाज ऋचा घोष आणि वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर यांचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. जुलैमध्ये बांगलादेशविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी ऋचाला वगळण्यात आले होते. पण आता पाच महिन्यांनंतर ती एकदिवसीय संघात परतली आहे. वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटीत ऋचाने चमकदार कामगिरी केली. त्याचबरोबर तीतस साधू आणि डावखुरी फिरकीपटू सायका इशाक यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
श्रेयंका पाटीलची दोन्ही संघात निवड
अष्टपैलू श्रेयंका पाटीलला वनडे आणि टी-20 अशा दोन्ही संघात संधी मिळाली आहे. तिचा वनडे संघात प्रथमच समावेश करण्यात आला आहे. नुकतेच तिने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्या मालिकेतील तीन सामन्यांत श्रेयंकाने एकूण पाच विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ :
एकदिवसीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंह ठाकूर, तितास साधू, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा आणि हरलीन देओल.
टी-20 संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंह ठाकूर, तितास साधू, पूजा वस्त्रकार, कनिका आहुजा, मिन्नू मणी.
वनडे शेड्यूल :
पहिला वनडे सामना : 28 डिसेंबर, 2023
दुसरा वनडे सामना : 30 डेसेंबर, 2023
तिसरा वनडे सामान : 2 जानेवारी, 2024
टी-20 शेड्यूल
पहिला टी-20 सामना : 5 जानेवारी, 2024
दुसरा टी-20 सामना : 7 जानेवारी, 2024
तिसरा टी-20 सामना : 9 जानेवरी, 2024

🚨 NEWS 🚨#TeamIndia’s ODI & T20I squad against Australia announced.
Details 🔽 #INDvAUS | @IDFCFIRSTBankhttps://t.co/7ZsqUFR9cf
— BCCI Women (@BCCIWomen) December 25, 2023

Latest Marathi News ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे, टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा Brought to You By : Bharat Live News Media.