लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाची अल्पवयीन मुलांनी केली हत्या

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: लैंगिक अत्याचार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची तीन अल्पवयीन मुलांनी भोकसून हत्या केली. र पुरावे नष्ट करण्यासाठी संशयितांनी तरुणाचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात घडली असल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. (Minors Kill Sexual Assaulter)
लैंगिक अत्याचाराचा बदला घेण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने आणि त्याच्या दोन मित्रांनी गुरुवारी दिल्लीतील निजामुद्दीनमधील एका २५ वर्षीय तरुणाची खुकरीने भोसकून हत्या केली. निजामुद्दीन बस्ती येथील रहिवासी असलेल्या तरूणाचा तीन अल्पवयीन मुलांनी दगडाने ठेचून चेहरा विद्रूप केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पेटवून दिला, असे पोलिसांनी दिलेल्या माहित म्हटले आहे. (Minors Kill Sexual Assaulter)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील तीन संशयितांना शनिवारी ताब्यात घेतले आहे. “तिघांनी खुलासा केला की, त्यांनी आझाद म्हणून ओळखल्या जाणार्या एका व्यक्तीची हत्या केली होती आणि त्याचा मृतदेह खुसरो पार्कमध्ये पडला होता. यानंतर पोलिसांच्या एाक टीमने घटनास्थळी धाव घेतली. तिथे त्यांना अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. यानंतर गुन्हे आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. तसेच पुढील तपासासाठी अर्धवट जळालेला मृतदेह एम्समध्ये पाठवण्यात आला आहे असेही दिल्ली दक्षिण-पूर्वचे पोलिस उपायुक्त राजेश देव यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे.
या घटनेत पोलिसांनी हत्या केलेल्या तरूणाने यामधील एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला आहे. दरम्यान गुन्ह्यात वापरलेले खुकरी प्रकारचे हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे. तीन अल्पवयीन मुलांपैकी दोघे १६ वर्षीय तर एक १७ वर्षीय आहे. दरम्यान त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. तिघांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. (Minors Kill Sexual Assaulter)
हेही वाचा:
Ashish Shelar on Uddhav Thackeray | ” भोंदूगिरी सोडा, श्रीराम म्हणा…”; भाजपच्या आशिष शेलारांचे ट्विट चर्चेत
राम मंदिराच्या तळमजल्यावरील १४ दरवाजांना सुवर्ण ‘झळाळी’!, जाणून घ्या अयोध्येत कशी सुरु आहे तयारी
Gautami Deshpande Wedding : माझा होशील ना फेम गौतमी विवाहबंधनात, कोण आहे पती स्वानंद तेंडुलकर?
Latest Marathi News लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाची अल्पवयीन मुलांनी केली हत्या Brought to You By : Bharat Live News Media.
