लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे राजौरीत, घेतला सुरक्षेचा आढावा

पुढारी ऑनलाईन : लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी जम्मू-काश्मीरच्या राजौरी- पुंछ सेक्टरला भेट देऊन तेथील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. तेथील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांना दहशतवादविरोधी कारवाई आणि सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी उचललेल्या उपाययोजनांची माहिती दिली. राजौरी सेक्टरमधील डेरा की गलीच्या जंगल परिसरात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. यामुळे पुंछ जिल्ह्यातील बाफलियाज भागात सुरक्षा … The post लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे राजौरीत, घेतला सुरक्षेचा आढावा appeared first on पुढारी.

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे राजौरीत, घेतला सुरक्षेचा आढावा

Bharat Live News Media ऑनलाईन : लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी जम्मू-काश्मीरच्या राजौरी- पुंछ सेक्टरला भेट देऊन तेथील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. तेथील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांना दहशतवादविरोधी कारवाई आणि सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी उचललेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
राजौरी सेक्टरमधील डेरा की गलीच्या जंगल परिसरात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. यामुळे पुंछ जिल्ह्यातील बाफलियाज भागात सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात गुरूवारी राजौरी सेक्टरमधील थानंडीजवळ दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला होता. त्यात चार जवान शहीद झाले होते तर तीन जण जखमी झाले होते.
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, २२ डिसेंबर रोजी बाफलियाज भागात ३ नागरिकांचा रहस्यमयरित्या परिस्थितीत मृत्यू झाल्याचे आढळून आले होते. दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांनी कोठडीत छळ केल्याच्या आरोपानंतर भारतीय लष्कराने या घटनेच्या अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, आणखी पाच नागरिकांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Army chief Gen Manoj Pande reviewed the situation on the ground in Rajouri and was briefed by the senior Army brass there about the ongoing counter-terrorist operations and steps taken to further strengthen the security grid: Army officials
(file pic) pic.twitter.com/BV4xCKR0zW
— ANI (@ANI) December 25, 2023

Latest Marathi News लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे राजौरीत, घेतला सुरक्षेचा आढावा Brought to You By : Bharat Live News Media.