
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ठसकेबाज गाण्यांवर प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. (Gautami Patil ) मात्र आता गौतमी पाटील ‘इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका… आता कसं व्हायचं पावनं, चीझ मी लई कडक’ म्हणत आहे. सप्तसूर म्युझिकच्या नव्याकोऱ्या गाण्यात गौतमी पाटील झळकली आहे.
या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या –
Alia Bhatt : जणू बार्बी डॉलचं; आलिया – रणबीरनं दाखवला ‘राहा’ चा चेहरा (VIDEO)
Gautami Deshpande Wedding : माझा होशील ना फेम गौतमी विवाहबंधनात, कोण आहे पती स्वानंद तेंडुलकर?
Arbaaz Khan-Shura Wedding : लग्नाला हिजाब घालून आली शौरा; सलमान थिरकला ‘लेके प्रभू का नाम’ वर
सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी चीझ लई कडक या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. विकी वाघ यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलेलं हे गाणं वैशाली सामंत यांनी गायलं आहे. तर या गाण्यात गौतमी पाटीलसह कुणाल पाटील, कुणाल मासले, मनोज कुंभार, आदम शेख यांनी भूमिका केली आहे. अतिशय धमाल शब्द, ठेका धरायला लावणारी उडती चाल असल्याने हे गाणं नक्कीच प्रेक्षकांची दाद मिळवणार यात काहीच शंका नाही.
चीझ लई कडक या गाण्यात एक गोष्ट सांगण्यात आली आहे. गुंडांच्या अड्ड्यावर होणाऱ्या या गाण्यात गौतमी पाटील नेमकं काय करते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहावा लागेल.
Latest Marathi News गौतमी पाटीलची बेधुंद अदाकारी, ‘इश्काचा मौका’ व्हिडिओ पाहाच Brought to You By : Bharat Live News Media.
