भोंदूगिरी सोडा, श्रीराम म्हणा…; आशिष शेलारांचे ट्विट चर्चेत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: “अजूनही सांगतोय…भोंदूगिरी सोडा आणि जय श्रीराम म्हणा…!” असा सल्ला देणारे भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार यांचे ट्विट सध्या चर्चेत आहे. शेलारांनी केलेल्या ट्विटर पोस्टमधून उद्धव ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. (Ashish Shelar on Uddhav Thackeray)
मंबाजी- तुंबाजी मातोश्रीत शिरलेत, तर…
शेलार यांनी म्हटले आहे की, गांजा, चिलीम ओढून “हग्रलेख” लिहिणारे, भोंदूगिरी करून बडबड करणारे आता भयंकर बिथरले आहेत. दरम्यान, मंबाजी- तुंबाजी तर मातोश्रीत शिरलेत. पत्रकार पोपटलाल यापैकी एकाची किंवा प्रसंगी दोघांची भूमिका पण चोख बजावत आहेत, अशी टीका शेलार यांनी उद्वव ठाकरे यांच्या गटावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन केली आहे. (Ashish Shelar on Uddhav Thackeray)
तुमच्या विझणाऱ्या दिव्या खालचा अंधार बघा
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा दणदणीत विजय होणार हे जनतेने ठरवले आहे. त्यामुळे आपलं “कुटुंब” सावरण्यासाठी धडपडणारे बरळत आहेत. तुम्ही तुमच्या विझणाऱ्या दिव्या खालचा अंधार बघा. देव, देश आणि धर्माची चिंता जनता करेल! तसेच अजून सांगतोय भोंदूगिरी सोडा, श्रीराम म्हणा…तरच तुम्ही वाचाल नाहीतर शिल्लक राहिले तेवढे देखील संपून जाल असा प्रत्यक्ष इशारा देखील भाजपच्या ॲड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे गटाला दिला आहे. (Ashish Shelar on Uddhav Thackeray)
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा दणदणीत विजय होणार हे जनतेने ठरवले आहे. त्यामुळे आपलं “कुटुंब” सावरण्यासाठी धडपडणारे बरळत आहेत.
गांजा, चिलीम ओढून “हग्रलेख” लिहीणारे, भोंदूगिरी करून बडबड करणारे आता भयंकर बिथरले आहेत.
मंबाजी- तुंबाजी तर मातोश्रीत शिरलेत… पत्रकार…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 25, 2023
हेही वाचा:
राम मंदिराच्या तळमजल्यावरील १४ दरवाजांना सुवर्ण ‘झळाळी’!, जाणून घ्या अयोध्येत कशी सुरु आहे तयारी
Telangana Accident : दुर्दैवी! घरातील एकाचा अपघाती मृत्यू, घटनास्थळी जाताना कुटुंबातील आणखी चौघांना मृत्यूने गाठले
Rahul Dravid : अखेर वर्ल्डकप फायनल पराभवावर राहुल द्रविड यांनी सोडले मौन, “हे हृदयद्रावक…”
Latest Marathi News भोंदूगिरी सोडा, श्रीराम म्हणा…; आशिष शेलारांचे ट्विट चर्चेत Brought to You By : Bharat Live News Media.
