लग्नाला हिजाब घालून आली शौरा; सलमान थिरकला ‘लेके प्रभू का नाम’ वर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खानने वयाच्या ५६ व्या वर्षी दुसऱ्यांदा अभिनेत्री शौरा खानशी लग्न केलं. या शाही विवाह सोहळा सलमान खानची बहिण अर्पिता खान हिच्या मुंबईतील घरी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या विवाहाला खास करून अरबाजचे भाऊ बॉलिवूड अभिनेता सलमान खान, सोहेल खान, अरबाजचा मुलगा अरहान खान आणि त्याचे वडील … The post लग्नाला हिजाब घालून आली शौरा; सलमान थिरकला ‘लेके प्रभू का नाम’ वर appeared first on पुढारी.
लग्नाला हिजाब घालून आली शौरा; सलमान थिरकला ‘लेके प्रभू का नाम’ वर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खानने वयाच्या ५६ व्या वर्षी दुसऱ्यांदा अभिनेत्री शौरा खानशी लग्न केलं. या शाही विवाह सोहळा सलमान खानची बहिण अर्पिता खान हिच्या मुंबईतील घरी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या विवाहाला खास करून अरबाजचे भाऊ बॉलिवूड अभिनेता सलमान खान, सोहेल खान, अरबाजचा मुलगा अरहान खान आणि त्याचे वडील सलीम आणि आई सलमा खान उपस्थित होते. या विवाहातील काही क्षणाचे काही फोटो अरबाजने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. दरम्यान शौरा लग्नाला येताना हिजाब घालून आली आहे. तर दुसरीकडे सलमानने भावाच्या लग्नात धमाकेदार परफॉर्मन्स केला आहे. ( Arbaaz Khan-Shura Wedding )
संबंधित बातम्या 

Christmas Special Movie: “डॉक्टर जी” चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर आज
Arbaaz Shura Khan Wedding : लग्नानंतर अरबाजचे शौराशी लिपलॉक, खास पोस्टमध्ये लिहिलं…
Arbaaz -Shura Khan Wedding | अरबाज खान ५६ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर, शौरा खानशी बांधली लग्नगाठ, पाहा फोटो

अरबाज खानने शौरा खानशी काल म्हणजे, २४ डिसेंबर २०२३ रोजी रात्री लग्न केलं आहे. यानंतर एक-एक करून लग्नातील फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. दरम्यान एका व्हिडिओतून लग्नासाठी शौराने हिजाब घातल्याचे दिसतेय. यावेळी शौरा एका कारमधून उतरत असून ती लग्नाच्या घरात जाताना दिसतेय. यावेळी तिच्यासोबत तिचे नातेवाईकही उपस्थित असून कारमधून उतरताना दिसतात. लाईट बेबी पिंक रंगाच्या हिजाबमध्ये ती दिसली. हा तिचा व्हिडिओ विरल भयानी इंन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.
दरम्यान अरबाजचा भाऊ आणि बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानने तिच्या वहिणीसोबत (शौरा) लग्नात ‘टायगर ३’ च्या ‘लेके प्रभू का नाम’ या गाण्यावर डेका धरला. यावेळी सलमान, अरबाज, शौरा, अरहान, खान परिवारांसोबत मित्रमंडळींनी यावेळी आनंदाने डान्स केला. सर्वजण यावेळी खूपच आनंदात होते.
अरबाजने लग्नात फ्लोरल प्रिंटेड सूट तर शौराने गोल्डन ब्लाऊज आणि प्रिंटेड लेहेंगा सोबत मॅचिंग दुपट्टा परिधान केला होता. शौराने हेवी नेकलेस, पिंक न्यूड मेकअप, ओपन कर्ली हेअर सोबत लूक पूर्ण केला. या लूकमध्ये ती परीसारखी दिसत होती. लग्नानंतर अरबाज आणि शौरावर सोशल मीडियातून भरभरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अरबाजचे याआधी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरासोबत लग्न झाले होते. लग्नाच्या १९ वर्षांनंतर ११ मे २०१७ रोजी दोघांनी अधिकृतपणे घटस्फोट घेतला. यानंतर आता अरबाजने शौराशी लग्नगाठ बांधली. ( Arbaaz Khan-Shura Wedding )

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Latest Marathi News लग्नाला हिजाब घालून आली शौरा; सलमान थिरकला ‘लेके प्रभू का नाम’ वर Brought to You By : Bharat Live News Media.