पुणेकरांची दिवाळी झोकात ! खर्च केले तब्बल चार ते पाच हजार कोटी

पुणे : लक्ष्मी रस्त्यापासून ऑनलाइन खरेदीपर्यंत… कंदील, पणतीपासून फटाक्यांपर्यंत… ड्रायफ्रुटपासून लाडू, चिवडा, शंकरपाळे आदी फराळांची खरेदी करीत पुणेकरांनी प्रकाशाचा उत्सव अर्थात दिवाळी साजरी केली. दिवाळीची चाहूल लागताच खासगी आस्थापनांसह घरगुती स्वरूपात पुणेकरांनी भेटवस्तू, कपडे, सोने, फटाके, पणत्या, कंदील आदींची मनसोक्त खरेदी केली. या काळात पुण्यातील बाजारपेठांमध्ये जवळपास चार ते पाच हजार कोटींची उलाढाल झाल्याचे मत … The post पुणेकरांची दिवाळी झोकात ! खर्च केले तब्बल चार ते पाच हजार कोटी appeared first on पुढारी.

पुणेकरांची दिवाळी झोकात ! खर्च केले तब्बल चार ते पाच हजार कोटी

शंकर कवडे

पुणे : लक्ष्मी रस्त्यापासून ऑनलाइन खरेदीपर्यंत… कंदील, पणतीपासून फटाक्यांपर्यंत… ड्रायफ्रुटपासून लाडू, चिवडा, शंकरपाळे आदी फराळांची खरेदी करीत पुणेकरांनी प्रकाशाचा उत्सव अर्थात दिवाळी साजरी केली. दिवाळीची चाहूल लागताच खासगी आस्थापनांसह घरगुती स्वरूपात पुणेकरांनी भेटवस्तू, कपडे, सोने, फटाके, पणत्या, कंदील आदींची मनसोक्त खरेदी केली. या काळात पुण्यातील बाजारपेठांमध्ये जवळपास चार ते पाच हजार कोटींची उलाढाल झाल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात आले.
मिठाई, सुकामेवा, दिवाळी
किट भेट देण्याकडे कल
सुमारे 100 ते 200 कोटी आप्तस्वकीयांसह मित्रमंडळींना भेट देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणेकरांकडून मिठाई, सुकामेवा व अभ्यंगस्नानाचे किट देण्याकडे पुणेकरांचा कल राहिला.
त्या पार्श्वभूमीवर शहरातील मिठाई विक्रेते, गिफ्ट पॅकिंग करणार्‍या कंपन्यांनी जोरदार तयारी केली होती. बाजारात 250 रुपयांपासून पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत गिफ्ट बॉक्स उपलब्ध होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सुकामेवा स्वस्त असल्याने सुकामेव्याचे गिफ्ट बॉक्सही मोठ्या प्रमाणात स्वस्त होते. त्यामुळे ते खरेदी करीत भेट देण्यास पुणेकर पसंती देत होते. यामध्ये खासगी आस्थापनांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे सांगण्यात आले.
या किटला राहिली मागणी
अभ्यंग किट – साबण, स्नानगंध, उटणे, लिप बाम, सुगंधी तेल, अत्तर. सुकामेवा किट – अक्रोड, काजू, बदाम, पिस्ता, मनुके, सुके अंजीर. मिठाई बॉक्स – पेढा, बर्फी, काजूकतली, 4पान 4 वर
हलवा, गुलाबजाम, रसगुल्ले ई-कॉमर्सद्वारे कपडे, घरगुती साहित्य खरेदीस पसंती
सुमारे 80 ते 100 कोटी -पुणेकरांचे आवडते खरेदी ठिकाण असलेला लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, तुळशीबागेत कपडे, दागिने तसेच अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी नागरीकांची झुंबड उडाली होती. मध्यवर्ती भागातील दुकानांसह उपनगरांतील दुकाने ग्राहकांच्या गर्दीने गजबजून गेले होते. दिवाळीसाठी नवनवीन खपडे खरेदी करण्यासह अन्य साहित्यांच्या खरेदीसाठी नागरीकांनी या रस्त्यावर ऑनलाईन संकेतस्थळावरही झुंबड उडाली होती. दिवाळीच्या अनुषंगाने दुकानदार तसेच ई-कॉमर्स कंपनीकडून खरेदीवर आकर्षक सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. यात कपड्यांपासून पणत्या, ड्रायफ्रुटस्, मोबाईल, फ्रीज, एलईडींवर विशेष सवलती होत्या. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह किराणा सामानदेखील ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध झाल्याने पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.मात्र, जे पुणेकर ऑनलाईनऐवजी ऑफलाईन खरेदीला प्राधान्य देतात. त्यामुळे, मध्यवर्ती भागातील रस्ते गजबजून गेले होते.
पुणेकरांकडून याला मिळाली जास्त पसंती
तरूणी – आलिया कट कुर्ती, नायरा कट कुर्ती, प्रिन्सेस कट कुर्ती, इंडो वेस्टर्न कुर्ती यांसह कॉटन व रेयॉनस्लिमकधील एथिनिक ड्रेस तरूण – क्रॉस कट कुर्ता, शॉर्ट प्रिंटेड , चिकनकरी, कलामकारी कुर्ता यांसह जीन्स, क्वाड्रा, लेनिन, जॅकेट महिला – आर्गांझा फ्लोरल प्रिंट, सिल्क साडी, रफल साडी, सॉफ्ट सिल्क,बनारसी साडी, स्क्विन साडी, बाटिक प्रिंटेड
सोन्या-चांदीचे कॉईन, बिस्किट अन् मूर्तीस पसंती
उलाढाल दीड ते दोन हजार कोटी दिवाळीसाठी बोनस देण्यासाठी सराफा बाजारात सोन्या-चांदीचे कॉईन, बिस्किट यांसह लक्ष्मीमुर्तीस विशेष मागणी राहिली. याखेरीज, पाडव्याला सोने खरेदी करणे हा शुभमुहूर्त समजला जातो. पाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांनी सोन्याच्या दागिन्यांची मनसोक्त खरेदी केली. त्यामुळे, आगामी लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर दागिन्यांसह, वेढणी, कॉईन तसेच बिस्कीटची आगाऊ नोंदणी करण्याकडे नागरीकांचा कल दिसून आला. त्यापार्श्वभूमीवर शहरातील सराफा व्यावसायिकांनी पुणेकरांसाठी विविध ऑफर देऊ केल्या होत्या. यामध्ये, सोने खरेदीवर तेवढीच चांदी फ्री, लकी ड्रॉ कूपन, मजुरीवर डिस्काऊंट, पैठणी साडी, वेढणीसाठी स्वतंत्र काऊंटर आदी व्यवस्था करण्यात आल्या होत्या. दिवाळीच्या सुरवातीपासून ते पाडव्यापर्यंत पुणेकरांनी जवळपास पाच ते सात टनाहून अधिक सोने खरेदी केल्याचा अंदाज सराफा बाजारातून व्यक्त करण्यात आला. शहरातील लक्ष्मी रस्त्यासह उपनगरांतील सुवर्णपेढ्यांमध्ये नागरीकांनी सोने खरेदीस प्राधान्य दिल्याने सराफा बाजारात चैतन्याचे वातावरण होते.
हवेत उडवल्या जाणा-या फटाक्यांची क्रेझ
उलाढाल – 40 ते 50 कोटी दिवाळी आणि फटाके हे समीकरण ठरलेलचं. त्यापार्श्वभूमीवर दिवाळीच्या पाच दिवसांपुर्वीच शहरासह उपनगरांत फटाके विक्रीची स्टॉल उभारल्याचे दिसून आले. यंदाही पुणेकरांनी फटाक्यांची मनसोक्त खरेदी करत लक्ष्मीपूजनाासह पाडवा व भाऊबीजेदिवशी फटाक्यांची मनसोक्त आतषबाजी केली. चिमुकल्यांसह ज्येष्ठांनीही फटाके वाजविण्याचा आनंद घेतला. मोठया आवाजापेक्षा कमी आवाजाचे, प्रदुषण कमी करणार्या चमचमणार्या फटाक्यांना मागणी चांगली राहिली. महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांसोबतच मुख्यत कर्नाटक, केरळ व मध्य प्रदेश या राज्यातून फटाके बाजारात विक्रीसाठी दाखल झाले होते.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा कमी प्रदूषण करणारे फॅन्सी फटाके बाजारात मोठ्या प्रमाणात आले होते. त्यांना मोठी मागणी राहिल्याचे सांगून त्यांच्या विक्रीतही मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
पूजनासाठी मध्य प्रदेशातून आल्या लक्ष्मी
उलाढाल – 50 ते 60 लाख लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीचे रुप असलेल्या झाडूला अनन्यसाधारण महत्व असते. या दिवशी घराघरांत झाडूला लक्ष्मीच्या स्वरूपात पुजले जाते. फ्लॅट संस्कृतीमुळे बहुतांश घरातून झाडूचे विविध प्रकार उपलब्ध असले तरी पूजेच्या दिवशी खजुर तसेच शिंदीच्या पानांपासून तयार केलेल्या पारंपरिक लक्ष्मीला पूजन्याची परंपरा आजही कायम आहे. त्यापार्श्वभूमीवर बाजारात मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दाखल झाल्या होत्या. बाजारात लहान आकाराच्या केरसुणीची 8 ते 10 रुपये, मध्यम 15 ते 28 रुपये, मोठी 30 ते 40 रुपये तर कंगणची 40 ते 50 रुपयांना विक्री होत होती.
कंदील, लक्ष्मीमुर्ती, पणत्यांच्या पूजा साहित्य खरेदीचा थाट
उलाढाल – 80 ते 100 कोटी – घर असो किंवा दुकान असो किंवा कार्यालय दिवाळीत कंदील, पणती लावून याठिकाणी सजावट करण्यात येते. त्यासाठी कसबा पेठेसह केशवनगरमधील कुंभारवाड्यासह बाजारपेठांमध्ये पणत्या, कंदील खरेदीसाठी गर्दी झाली
होती. लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठे महत्त्व असते. त्यापार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये धनलक्ष्मी रुपातील पारंपरिकसह दाक्षिणात्य शैलीतील मुर्ती अर्ध्या फुटांपासून ते सव्वा फुटांच्या मुर्ती दाखल झाल्या आहेत. मागील दोन हातात पुष्प, तर पुढील एका हाताने आशीर्वाद तर दुसर्या हाताने धनवर्षाव करणार्या अत्यंत आकर्षक व सुबक मुर्तीची आकारानुसार 500 ते 2000 रुपयांपर्यंत विक्री होत होती. तसेच, लक्ष्मीपूजनासाठी लागणार्या हळद, कुंकू, अगरबत्ती, धूप, कापूर, वस्त्र आदी साहित्यांच्या बाजारातही मोठी उलाढाल झाली.
बालचमूंसाठी किल्ले अन् मावळ्यांचे आकर्षण
रायगड, राजगड, प्रतापगडासह काल्पनिक किल्ल्यांची चलती यंदा बाजारात दिसून आली. 8 इंचापासून 3 फुटांपर्यंतचे किल्ले घेण्यासाठी बालचमूंचा पालकांकडे आग्रह दिसून येत होता. बाजारात, किल्लासह त्यावर ठेवण्यासाठी लागणारे मावळे, तोफा, प्राणी, पोलिस, सैनिकांसह गवळणींनाही मोठी मागणी राहिली. बाजारात 250 रुपये डझनपासून त्यांची विक्री करण्यात आल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
दिवाळी पहाट अन् दिवाळी अंकांचीही चलती
उलाढाल – 100 ते 150 कोटी- दिवाळी म्हंटली की पहाटेला शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम अन् घरी आल्यावर अक्षर फराळ हे समीकरण ठरलेलच. त्याअनुषंगाने शहरात ठिकठिकाणी गायकांच्या सुमधूर स्वर अन् कलाविष्कारांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याखेरीज, नामवंत लेखकांच्या लेखातून साकारलेल्या दिवाळी अंकामुळे पुणेकरांची दिवाळी खास राहिली. त्यात काही प्रकाशकांनी ऑडीओ स्वरुपात अंक उपलब्ध करून दिल्याने पुणेकरांठी ही गोष्ट नवीन ठरली.
पाडव्याच्या मूहूर्तावर इलेक्ट्रॉनिक व गृहोपयोगी वस्तूंची खरेदी
उलाढाल – 200 ते 300 कोटी- पाडव्याच्या मुहूर्तावर घरात नवीन फर्निचर, तसेच आवश्यक साहित्य घेण्याकडेही नागरीकांचा कल दिसून आला. त्यामुळे, शहरातील इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्येही उत्साहाचे वातावरण होते. बाजारात फर्निचरमध्ये लाकडी, लोखंडी कपाटे, शोकेस, सोफासेट, डायनिंग टेबल, आराम खुर्ची, झोपाळे यांसह इलेक्ट्रॉनिक्सच्या साहित्यामध्ये टिव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, घरगुती वापरायच्या वस्तू, आकर्षक झुंबर, विद्युत दिवे खरेदी करण्यास ग्राहकांनी प्राधान्य दिले. पाडव्याच्या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी खरेदीवर बंपर ऑफर्स जाहीर केल्या आहेत. मूळ किंमतीवर 30 ते 40 टक्के सवलतीही उपलब्ध करून दिल्या आहेत.
झेंडू, शेवंती, चमेली, मोगरा फुलला
उलाढाल – 7 ते 10 कोटी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील घाऊक फुलबाजारासह अन्य बाजारांत फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. सणासाठी झेंडूच्या विशेष महत्त्व असते. यादिवशी पूजेसह नवीन वाहन तसेच घर खरेदी केल्यानंतर त्याची सजावट तसेच पूजा करताना झेंडू या फुलाचा प्रामुख्याने वापर केला जातो. त्याअनुषंगाने सोलापूर, बारामती तसेच पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून बाजारात आलेल्या
कलकत्ता गोंडा, लाल व पिवळ्या रंगाच्या झेंडूसह
शेवंतीने बाजार फुलल्याचे चित्र दिसून आले. सणासाठी झेंडूसह शेवंती, बिजली, गुलछडी, अ‍ॅष्टर, मोगरा, कागडा आदी फुलांना मोठी मागणी वाढल्याने फुलांच्या दरात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली होती. त्याच्या खरेदीसाठी शहरातील खरेदीदार तसेच नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. आवकच्या तुलनेत मागणी वाढल्याने झेंडूच्या फुलांसह अन्य सर्वच फुलांना मागणी असल्याने फुले तेजीत राहिले.
 
The post पुणेकरांची दिवाळी झोकात ! खर्च केले तब्बल चार ते पाच हजार कोटी appeared first on पुढारी.

पुणे : लक्ष्मी रस्त्यापासून ऑनलाइन खरेदीपर्यंत… कंदील, पणतीपासून फटाक्यांपर्यंत… ड्रायफ्रुटपासून लाडू, चिवडा, शंकरपाळे आदी फराळांची खरेदी करीत पुणेकरांनी प्रकाशाचा उत्सव अर्थात दिवाळी साजरी केली. दिवाळीची चाहूल लागताच खासगी आस्थापनांसह घरगुती स्वरूपात पुणेकरांनी भेटवस्तू, कपडे, सोने, फटाके, पणत्या, कंदील आदींची मनसोक्त खरेदी केली. या काळात पुण्यातील बाजारपेठांमध्ये जवळपास चार ते पाच हजार कोटींची उलाढाल झाल्याचे मत …

The post पुणेकरांची दिवाळी झोकात ! खर्च केले तब्बल चार ते पाच हजार कोटी appeared first on पुढारी.

Go to Source