यापुढे मी देवाच्या अस्तित्वावर कधी प्रश्नचिन्ह करणार नाही : दीप्ती तळपदे
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : माझे जीवन, श्रेयस, घरी परतले आहे… सुरक्षित आणि सुरक्षित. असे म्हणत अभिनेता श्रेयस तळपदेची पत्नी दीप्ती तळपदेने इन्स्टावर पोस्ट केली आहे. श्रेयस तळपदेला रुग्णालयातून डिस्जार्च देण्यात आला आहे. त्याला रात्री एका कार्यक्रमातून घरी परतल्यानंतर हार्ट ॲटॅक आला होता. (Shreyas Talpade) त्यानंतर दिप्तीने त्याला तत्काळ रुग्णालयात नेले होते. तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली अन् तो सुखरुप घरी परतला आहे. त्यानंतर दीप्तीने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Shreyas Talpade )
संबंधित बातम्या –
Fighter Song : हृतिक- दीपिकाच्या ‘फायटर’ चं ‘इश्क जैसा कुछ’ दुसरं गाणं रिलीज
Hina Khan : अच्छा, तर तुम्ही मला सांगणार का, पोज कशी द्यायची? हिना भडकली… (Video)
जाऊ बाई गावात : ‘आर्मी टास्क करताना हार्दिकचा हात निखळला’
तिने श्रेयससोबत काही फोटो शेअर करत पोस्ट लिहिलीय की, मी श्रेयसशी वाद घालत असे की, मी विश्वास कुठे ठेवावा. आज मला माझ्या प्रश्नाचे उत्तर माहिती झाले आहे. सर्वशक्तिमान देव. आमच्या आयुष्यात ही भयानक घटना घडली त्या संध्याकाळी तो माझ्यासोबत होता. यापुढे त्याच्या अस्तित्वावर मी कधी प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही.
दिप्तीने श्रेयस घरी आल्यानंतर पोस्ट लिहिली. तिने म्हटलंय की, मी कोणावर विश्वास ठेवू असा मला प्रश्न पडायचा आणि मी श्रेयससोबत वाद घालयचे. आता मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून उत्तर आहे सर्वशक्तिमान देव. जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा तोच आमच्यासोबत होता. मी कधीही देवाच्या अस्तित्वावर यापुढे शंका घेणार नाही.” संकटसमयी मदतीला आलेल्या सर्वांचे तिने आभार मानले आहेत. अनेक अज्ञात व्यक्ती, श्रेयसवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, कर्मचारी, फॅन्सचे दीप्तीने पोस्टमधून आभार मानले आहेत.
View this post on Instagram
A post shared by Deepti Shreyas Talpade (@deeptitalpade)
The post यापुढे मी देवाच्या अस्तित्वावर कधी प्रश्नचिन्ह करणार नाही : दीप्ती तळपदे appeared first on Bharat Live News Media.