सोलापूर : पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात; एकाचा मृत्यू

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : हिंगोलीकडून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांचे पिकअप हे वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात एका भाविकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत महिला, पुरुष, बालक, जखमी झाले आहेत. अपघात आज (दि. २१) पहाटे पाचच्या सुमारास कुर्डूवाडी शेटफळ रोडवर झाला. राजाराम शिंदे असे मृत भाविकाचे नाव आहे. १०८ क्रमांक ॲम्बुलन्सच्या तत्पर सेवेमुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत … The post सोलापूर : पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात; एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

सोलापूर : पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात; एकाचा मृत्यू

सोलापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : हिंगोलीकडून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांचे पिकअप हे वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात एका भाविकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत महिला, पुरुष, बालक, जखमी झाले आहेत. अपघात आज (दि. २१) पहाटे पाचच्या सुमारास कुर्डूवाडी शेटफळ रोडवर झाला. राजाराम शिंदे असे मृत भाविकाचे नाव आहे. १०८ क्रमांक ॲम्बुलन्सच्या तत्पर सेवेमुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत झाली.
हिंगोली जिल्ह्यातील वरुड गावचे सात पुरुष, सहा महिला आणि लहान मुलांसह पिकप वाहनातून बुधवारी रात्री पंढरपूरकडे निघाले होते. आज पहाटे पाचच्या सुमारास कुर्डूवाडी शेटफळ रोडवर शेटफळ जवळ चार किलोमीटर अंतरावर भाविकांचे हे वाहन पलटी झाले. या अपघातात राजाराम शिंदे या भाविकाचा मृत्यू झाला. त्यातील एक महिला गरोदर असून ती गंभीर जखमी झाली आहे. तर ३ पुरुष गंभीर जखमी आहेत. यातील गोविंद कोटकर (वय ३०) याचा उजवा पाय मोडला आहे. ज्ञानबा डरुगे यांच्या दोन्ही पायाची हालचाल होत नाही. सरस्वती गजानन शिंदे या महिलेच्या डोक्याला मार लागला. ज्ञानेश्र्वर काळे या तरुणही जखमी झाला आहे. अपघात झाल्याचे कळताच कुर्डूवाडी येथील १०८ क्रमांक रूग्णवाहीका चालक संतोष चव्हाण आणि डॉक्टर ओंकार मोहिते तसेच शेटफळच्या १०८ रूग्णवाहीकेचे चालक आप्पा राऊत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने जखमींना कुर्डूवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
The post सोलापूर : पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात; एकाचा मृत्यू appeared first on Bharat Live News Media.

Go to Source