दौंडच्या धमकी प्रकरणात अखेर ‘तडजोड’

दौैंंड : पुढारी वृत्तसेवा :  दौंड शहरात 15 डिसेंबर रोजी शहरातील बड्या नेत्यांच्या घरात, कार्यालयात घुसून धमकावल्याप्रकरणी या नेत्याने पोलिस तक्रार न करता तडजोडीने प्रकरण मिटविण्याचा मार्ग स्वीकारला आहे. सातार्‍यातील काही युवकांनी दौंड शहरात असलेल्या पुनर्वसन जमिनी व्यवहारात जाब विचारण्यासाठी हा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे. या नेत्याच्या कार्यालयात असलेल्या टेबलवर एक देशी कट्टा ठेवून … The post दौंडच्या धमकी प्रकरणात अखेर ‘तडजोड’ appeared first on पुढारी.

दौंडच्या धमकी प्रकरणात अखेर ‘तडजोड’

दौैंंड : Bharat Live News Media वृत्तसेवा :  दौंड शहरात 15 डिसेंबर रोजी शहरातील बड्या नेत्यांच्या घरात, कार्यालयात घुसून धमकावल्याप्रकरणी या नेत्याने पोलिस तक्रार न करता तडजोडीने प्रकरण मिटविण्याचा मार्ग स्वीकारला आहे. सातार्‍यातील काही युवकांनी दौंड शहरात असलेल्या पुनर्वसन जमिनी व्यवहारात जाब विचारण्यासाठी हा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे. या नेत्याच्या कार्यालयात असलेल्या टेबलवर एक देशी कट्टा ठेवून या प्रकरणातील दलाल पासलकरला बोलावून घ्या आणि ते मिटवा, असे या युवकांनी नेत्याला बजावले होते.
हे प्रकरण घडून दोन दिवस झाले तरी याबाबतचे फिर्याद दौंड पोलिस ठाण्यात दाखल झाली नाही. याबाबत रविवारी (दि. 17) दै. ‘Bharat Live News Media’ने सडेतोड वृत्त प्रसिद्ध केल्याने दौंड शहरात मोठी खळबळ उडाली व हा चर्चेचा विषय झाला. याबाबत दौंड शहरात रविवारी दिवसभर हे प्रकरण तडजोडने मिटणार, अशी चर्चा रंगली होती. आता याबाबतचे तडजोडीची बैठक मंगळवारी (दि. 19) होणार असल्याचे खात्रीलायक समजते. एकंदरीतच या प्रकरणावर लवकरच पडदा टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत
पासलकरच्या भानगडींची चौकशी होणार का?
या प्रकरणातील बडा नेता दलाल पासलकरला का वाचवतोय याचीही चर्चा सध्या दौंडमध्ये सुरू आहे. कशासाठी तडजोड होत आहे.
गावठी कट्टा घेऊन कार्यालयात घुसलेल्या लोकांशी तडजोड करण्याची वेळ या बड्या नेत्यावर का आली, याचीही शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. दलाल पासलकरची सखोल चौकशी पोलिसांनी स्वतःच हाती घ्यावी, सोशल मीडियावर सर्व उपलब्ध आहे, अशी मागणी
होत आहे.
The post दौंडच्या धमकी प्रकरणात अखेर ‘तडजोड’ appeared first on Bharat Live News Media.

Go to Source