पंतप्रधान मोदींनी केले सूरत डायमंड बाजाराचे उद्घाटन
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आज (दि.१७) सूरत डायमंड बाजाराचे उद्घाटन केले. आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायासाठी हे जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र असेल. तब्बल ३४०० कोटी रुपये गुंतवून ३५.५४ एकर जमिनीवर उभारलेले सूरत डायमंड बाजार खडबडीत आणि पॉलिश्ड हिऱ्यांच्या व्यापारासाठी जागतिक केंद्र बनणार आहे. आयात-निर्यातीसाठी अत्याधुनिक ‘कस्टम क्लिअरन्स हाऊस’, किरकोळ दागिन्यांच्या व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल आणि इंटरनॅशनल बँकिंग आणि सेफ व्हॉल्ट्सची सुविधा यांचा यामध्ये समावेश असणार आहे.
#WATCH | Gujarat: Prime Minister Narendra Modi inaugurates the Surat Diamond Bourse
It will be the world’s largest and modern centre for international diamond and jewellery business. It will be a global centre for trading both rough and polished diamonds as well as jewellery.… pic.twitter.com/ri6GOiMby0
— ANI (@ANI) December 17, 2023
डायमंड बोर्स ही जगातील सर्वात मोठी परस्पर जोडलेली इमारत आहे. त्यात ४,५०० एकमेकांशी जोडलेली कार्यालये आहेत. या इमारतीत १७५ देशांतील ४,२०० व्यापारी सामावून घेण्याची क्षमता आहे जे पॉलिश्ड हिरे खरेदी करण्यासाठी सुरतला येतील. या व्यापार सुविधेमुळे अंदाजे १.५ लाख लोकांना रोजगार मिळेल. जगाच्या कानाकोपऱ्यातील हिरे खरेदीदारांना सुरतमध्ये व्यवसाय करण्यासाठी जागतिक व्यासपीठ मिळेल. सुरत शहराचे प्रवेशद्वार म्हणून, टर्मिनल भवनला स्थानिक संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन तयार केले आहे. (Surat Diamond Bourse)
जगातील सर्वात मोठी इमारत
याआधी जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘X’ वर एक मीडिया रिपोर्ट शेअर केला होता. ज्यात असे म्हटले होते की, सूरत डायमंड बोर्सने आता पेंटागॉनला मागे टाकले आहे. जी गेल्या ८० वर्षांपासून जगातील सर्वात मोठी कार्यालय इमारत आहे. सूरत डायमंड बाजार हे व्यापार, नावीन्य आणि सहकार्याचे केंद्र म्हणून काम करेल. अर्थव्यवस्थेला आणखी चालना देईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण करेल. (Surat Diamond Bourse)
हेही वाचा :
१६ व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या होऊ शकते कमी! ‘ही’ आहेत कारणे
अयोध्या रघुकुलाची राजकन्या श्रीरत्नादेवी कोरियाची महाराणी!
संसद सुरक्षा भंग प्रकरणाला बेरोजगारी आणि महागाई कारणीभुत; राहुल गांधी
The post पंतप्रधान मोदींनी केले सूरत डायमंड बाजाराचे उद्घाटन appeared first on Bharat Live News Media.