अंतराळ स्थानकाची पंचविशी

गेल्या पंचवीस वर्षांपासून पृथ्वीला 1 लाख 40 हजार प्रदक्षिणा घालणारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजेच ‘आयएसएस’ हे अंतराळ विज्ञान जगात शांततापूर्ण जागतिक सहकार्याचे आदर्श उदाहरण ठरले आहे. अंतराळवीरांच्या मुक्कामाचे ठिकाण असणार्‍या अंतराळ स्थानकात आतापर्यंत असंख्य प्रयोग झाले असून, या माध्यमातून अंतराळ विज्ञान, शास्त्र उलगडण्यास हातभार लागला आहे. ‘आयएसएस’ म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अर्थात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक … The post अंतराळ स्थानकाची पंचविशी appeared first on पुढारी.

अंतराळ स्थानकाची पंचविशी

महेश कोळी, आय.टी.तज्ज्ञ

गेल्या पंचवीस वर्षांपासून पृथ्वीला 1 लाख 40 हजार प्रदक्षिणा घालणारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजेच ‘आयएसएस’ हे अंतराळ विज्ञान जगात शांततापूर्ण जागतिक सहकार्याचे आदर्श उदाहरण ठरले आहे. अंतराळवीरांच्या मुक्कामाचे ठिकाण असणार्‍या अंतराळ स्थानकात आतापर्यंत असंख्य प्रयोग झाले असून, या माध्यमातून अंतराळ विज्ञान, शास्त्र उलगडण्यास हातभार लागला आहे.
‘आयएसएस’ म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अर्थात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे दिवसाच्या 24 तासांत सोळा वेळेस आपल्या डोक्यावरून फिरते, याची बहुतेकांना कल्पनाही नसते. एवढेच नाही, तर 410 किलोमीटरच्या उंचीवर 16 सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे हादेखील त्याच्या दिनचर्येचा भाग आहे. अंतराळ स्थानक पृथ्वीवरून पाहणे आणि दिवसभरात कोणत्या वेळी त्याचे कोठे स्थान असेल, हे शोधणे कठीण आहे. ‘आयएसएस’ आणि त्यातील अंतराळवीर काय करत असतात, याविषयी कधी फारशी चर्चा होत नसते. असे असले तरी या स्थानकाच्या मदतीने शोधलेल्या अनेक गोष्टी पृथ्वीवरच्या जीवावर थेट परिणाम करणार्‍या आहेत. आंतरराष्ट्रीय कूटनीती, शांतता आणि सहकार्यासाठी जगभरात सर्वात यशस्वी ठिकाणांपैकी एक म्हणून अंतराळ स्थानक आहे. एवढेच नाही, तर युद्धाच्या काळातही सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणून त्याची ओळख प्रस्थापित झाली आहे.
या अंतराळ स्थानकाचा पहिला सेगमेंट म्हणजे ‘जरया कंट्रोल मॉड्यूल’, जे रशियन होते आणि ते 20 नोव्हेंबर 1998 रोजी सोडण्यात आले. ‘जरया’ने अंतराळात इंधनसाठा आणि बॅटरी पॉवर पोहोचवली आणि ‘आयएसएस’वर पोहोचणार्‍या अन्य अंतरिक्ष यानांसाठी डॉकिंग झोनची भूमिका बजावली. या घटनेनंतर 4 डिसेंबर 1998 रोजी अमेरिकेने ‘युनिटी नॉड 1 मॉड्यूल’ लाँच केले. या दोन्ही मॉड्यूलच्या माध्यमातून अंतराळ प्रयोगशाळेने काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्टेशन उभे करण्यासाठी 42 असेम्ब्ली फ्लाईटच्या मदतीने ‘आयएसएस’ आकारास आले. रशिया, कॅनडा आणि जपानसह जगातील 20 देशांनी मिळून हे अंतराळ स्थानक अवकाशात पाठवले. तेथे सुरुवातीच्या काळात मुक्काम करणार्‍या अंतराळवीरांत ‘नासा’चे बिल शेपर्ड आणि रॉसमॉस के. युरी गिडजेंको आणि सर्जेई क्रिकालेव्ह यांचा समावेश होता. त्यावेळी अंतराळ स्थानकावर नेहमीच अंतराळवीर राहत असत.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पृथ्वीपासून सुमारे 410 किलोमीटर अंतरावर आहे. 109 मीटर लांब अंतराळ स्थानकाचे वजन 4 लाख 50 हजार किलो आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी त्याची अनेक भागात विभागणी झाली आहे. यात झोपण्यासाठी दहा क्वार्टर्स, दोन बाथरूम, एक जिम आणि एक 360 अंश द़ृश्य दिसणारी खिडकी आहे. ‘नासा’च्या माहितीनुसार, त्याचा आकार 109 मीटर म्हणजेच 357 फूट असून, ही जागा एका अमेरिकन फुटबॉल मैदानाएवढी आहे. आपल्याला पोहण्याचा छंद असेल तर त्याचा आकार ऑलिम्पिकमधील जलतरण तलावापेक्षा दुप्पट आहे, असे समजा. सोलर एरे विंगस्पॅनदेखील 109 मीटरचा आहे. त्याची तुलना कमर्शियल एअरक्राफ्टशी केली, तर एअरबस ए 380 चा विंगस्पॅन 7,918 मीटरचा असतो. एवढेच नाही, तर अंतराळ स्थानकात सुमारे 13 किलोमीटर लांबीच्या वीज तारांचे जाळे आहे. ‘आयएसएस’ हे एका दिवसाच्या कालावधीत पृथ्वीला अनेकदा प्रदक्षिणा घालते. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, दर 90 मिनिटांत 8 किलोमीटर प्रतिसेकंद वेगाने अंतराळ स्थानकाची ही प्रदक्षिणा मोहीम सुरू असते. स्पेस स्टेशनमध्ये अनेक हायटेक सुविधा आहेत. अशी अनेक उपकरणे आहेत, जी आपोआप काम करतात आणि अंतराळवीरांना अनेक प्रकारची माहिती देतात. हायटेक कॅमेर्‍यांसोबतच त्यात सेन्सर्सही बसवण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीने अंतराळ स्थानके, हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणातील बदल याविषयी नवीन माहिती प्रसिद्ध केली जाते.
एखादा अंतराळवीर काम करत नसेल, तर तो सामान्य स्पेस वॉक म्हणजे अंतराळात फिरत असतो. या आधारावर अंतराळ स्थानकाला नवीन गोष्टी जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, रोबोटिक हाताची दुरुस्ती आणि देखभाल करणे. अनेकदा अंतराळातील कचर्‍याच्या ढिगार्‍यांमुळे स्थानकाला झालेल्या हानीची चाचणी करावी लागते. त्यानंतर त्याची दुरुस्ती करावी लागते. अंतराळवीर हे आरोग्याशी संबंधित दिनक्रमाचे पालन करत असतात. त्यांना स्नायू आणि हाडे अशक्त होण्यापासून बचाव करावा लागतो. गुरुत्वाकर्षण कमी असल्याने अशाप्रकारचा त्रास होण्याचा धोका वाढतो. याचाच अर्थ त्यांना दररोज किमान दोन तासांपर्यंत विशेष मशिनवर व्यायाम करावा लागतो. यात ट्रेडमिलवर धावणे याचा समावेश असतो. परंतु, जसजसे संशोधक चंद्र किंवा मंगळावर मानवाचे वास्तव्य करण्यासंदर्भात अभ्यास वाढवत आहेत, तसतसे व्यायामाच्या माध्यमातून अंतराळात मानवी शरीरावर होणार्‍या परिणामाचे नव्याने आकलन करण्यात येत आहे. एखादी व्यक्ती गुरुत्वाकर्षणाशिवाय दीर्घकाळ राहिल्यास शरीराच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो किंवा त्या व्यक्तीची शक्ती राहील का? पृथ्वीवर परतल्यानंतर तो अशक्त होईल का? या गोष्टींचा अभ्यास केला जातो.
अंतराळवीरांनी या अंतराळ स्थानकात अनेक प्रयोग केले आहेत. अनेकदा तर ते स्वत:वरच प्रयोग करत असतात. उदाहरणार्थ, तब्येतीवर लक्ष ठेवणे, खानपान, सौर किरणोत्सर्गाच्या परिणामाचे आकलन करणे. याशिवाय पृथ्वीवर असलेल्या शास्त्रज्ञांसाठीदेखील ते प्रयोग करत असतात. त्यापैकी अनेक प्रयोगांना यशही लाभले आहे. अल्झायमरपासून पार्किसन्स, कर्करोग, अस्थमा, हृदयाशी संबंधित आजार या सर्वांवर अंतराळात संशोधन झाले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, काही प्रयोग तर केवळ अंतराळातच चांगल्यारीतीने करता येणे शक्य आहे. मात्र, तेथे पृथ्वीसारखे वातावरण लाभणे आणि तयार करणे कठीण राहते.
रशियाने 2022 च्या प्रारंभी युक्रेनवर हल्ला केल्यानंतर ‘आयएसएस’च्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. कारण, युरोपिय स्पेस एजन्सीने रशियाशी आंतरराष्ट्रीय सहकार्य करण्यास माघार घेतली. तसेच ‘आयएसएस’ वगळून स्वत:चे अंतराळ स्थानक तयार करावे, असे रशियाला सांगण्यात आले आहे. परंतु, वेगळे स्थानक तयार करण्याच्या या सूचनेस केवळ युद्ध हे कारण नाही. चीन, जपान, भारत, यूएईसह अनेक देशांनी अंतराळ संशोधनात पाऊल टाकले असून, ते अंंतराळात स्वत:ची ओळख प्रस्थापित करू इच्छित आहेत. दुसरीकडे, अमेरिका आणि युरोपने इंटरनॅशनल स्पेस स्टेशन 2030 पर्यंत चालविण्यास कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. मात्र, ‘आयएसएस’नंतरचा पर्याय शोधण्यासाठी जगभरात तयारी केली जात आहे. ‘नासा’ संपूर्णपणे आर्टेमिस प्रोग्रामवर लक्ष देत असून, चंद्रावर मानवी वस्ती उभारण्याची मनीषा बाळगून आहे. युरोपिय स्पेस एजन्सीनेदेखील नवीन स्थानक तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचे नाव ‘स्टारलॅब’ असे सांगितले आहे. अर्थात, भविष्यात अंतराळात काय होणार आहे, हे पाहणे रंजक ठरेल.
अलीकडील काळात हे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळण्याच्या चर्चा अनेकदा होताना दिसल्या. वास्तविक, ‘नासा’ला ते आणखी काही वर्षे अंतराळात ठेवायचे आहे; परंतु तसे करण्यासाठी देखभाल आवश्यक आहे. त्यामुळे धोकेही वाढू शकतात. यासाठी हजारो कोटी रुपये खर्च होणार आहेत. अमेरिकेने काही काळापूर्वी अंतराळ बजेटमध्ये कपात केली होती. त्यामुळे ते पृथ्वीवर उतरवण्याची तयारी सुरू आहे. ते पृथ्वीवर आणून पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी असलेल्या ‘पॉईंट निमो’ या ठिकाणी बुडवण्याचा त्यांचा मानस आहे, ज्याला ‘स्पेसक्राफ्टचे स्मशान’ म्हणूनही ओळखले जाते; पण ही प्रक्रिया तितकीशी सोपी नाही.
The post अंतराळ स्थानकाची पंचविशी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source