एमआयडीसी कार्यालयातील एजंटगिरीवर आता बंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– एजंट किंवा कन्सलटंटचा नेहमीच राबता असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (Nashik MIDC) कार्यालयात आता एजंटांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या महिन्यात नगरमधील दोघा एमआयडीसी अभियंत्यांंना तब्बल एक कोटींची लाच स्विकारताना अटक केली होती. त्यानंतर शहाणपण आलेल्या एमआयडीसीने कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच नोटीस लावून एजंटांना प्रवेशास बंदी केली आहे. सातपूर, आयटीआय सिग्नल येथील उद्योग … The post एमआयडीसी कार्यालयातील एजंटगिरीवर आता बंदी appeared first on पुढारी.

एमआयडीसी कार्यालयातील एजंटगिरीवर आता बंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– एजंट किंवा कन्सलटंटचा नेहमीच राबता असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (Nashik MIDC) कार्यालयात आता एजंटांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या महिन्यात नगरमधील दोघा एमआयडीसी अभियंत्यांंना तब्बल एक कोटींची लाच स्विकारताना अटक केली होती. त्यानंतर शहाणपण आलेल्या एमआयडीसीने कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच नोटीस लावून एजंटांना प्रवेशास बंदी केली आहे.
सातपूर, आयटीआय सिग्नल येथील उद्योग भवन इमारतीत दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एमआयडीसी कार्यालयात एजंटांचा नेहमीच राबता असतो. भूखंड मिळवून देण्यापासून ते उद्योगांच्या परवानग्या तसेच उद्योगांशी निगडीत इतर कामे ‘शॉर्टकट’ मार्गाने करवून घेण्यासाठी एजंटांचा आधार घेतला जातो. या एजंटांची थेट अधिकाऱ्यांशी जवळीकता असल्याने, त्यांच्या माध्यमातून कामेही लवकर होत असल्याचा अनेक उद्योजकांचा अनुभव आहे. तर एजंटांकडून फसवणूक झाल्याच्याही बऱ्याच उद्योजकांच्या तक्रारी आहेत. महत्त्वाचे म्हणजे एमआयडीसी कार्यालयातून दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. अशातही एजंटगिरी फोफावल्याने, एमआयडीसीतील अर्थकारण नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहे. गेल्या ४ नोव्हेंबर रोजी नगर उपविभागाचे सहाय्यक अभियंता (वर्ग २) अमित किशोर गायकवाड आणि तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ यांना एक कोटी रुपयांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली होती. हा गैरव्यवहार देखील एजंटाच्या माध्यमातूनच केला गेल्याची चर्चा एमआयडीसी वर्तुळात चर्चा आहे. (Nashik MIDC)
दरम्यान, यासर्व पार्श्वभूमीवर एमआयडीसी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच एजंट, कन्सलटंट यांना बंदी असल्याबाबतची नोटीस लावण्यात आली आहे. आता या नोटीसची योग्य ती अंमलबजावणी केली जावी, अशी माफत अपेक्षा उद्योग वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
एजंटांची ये-जा सुरूच (Nashik MIDC)
उद्योग भवन या इमारतीत उद्योगांशी निगडीत अनेक कार्यालये आहेत. एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, कामगार उपायुक्तालय, अन्न व औषध प्रशासन विभाग, उद्योग सुरक्षा विभाग यासह इतरही कार्यालये असल्याने इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एजंटांचा कायम राबता असतो. विशेषत: एमआयडीसी कार्यालयात एजंट हमखास बघावयास मिळतात. त्यांना मज्जाव घालण्यासाठी नोटीस लावली असली तरी, त्यांची ये-जा अजूनही कायम असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
काय आहे नोटीसमध्ये?
‘सर्व उद्योजक तथा नागरिकांना कळविण्यात येते की, प्रादेशिक अधिकारी कार्यालयात कोणत्याही कामासाठी एजंट अथवा कन्सलटंट यांची आवश्यकता नाही. या कार्यालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांबाबत एमआयडीसी वेबसाइटवर सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामुळे सेवांबाबत माहिती हवी असल्यास कार्यालयातील कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. कोणत्याही एजंट अथवा कन्सलटंट यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क करू नये.’ अशा आशयाची नोटीस लावण्यात आली आहे.
हेही वाचा :

Nashik Municipal Corporation : ‘त्या’ घटनेनंतर महापालिकेची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक
नद्यांचे विष!
महाराष्ट्र-कर्नाटकात होणार पाणी वाटप करार

The post एमआयडीसी कार्यालयातील एजंटगिरीवर आता बंदी appeared first on पुढारी.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– एजंट किंवा कन्सलटंटचा नेहमीच राबता असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (Nashik MIDC) कार्यालयात आता एजंटांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या महिन्यात नगरमधील दोघा एमआयडीसी अभियंत्यांंना तब्बल एक कोटींची लाच स्विकारताना अटक केली होती. त्यानंतर शहाणपण आलेल्या एमआयडीसीने कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच नोटीस लावून एजंटांना प्रवेशास बंदी केली आहे. सातपूर, आयटीआय सिग्नल येथील उद्योग …

The post एमआयडीसी कार्यालयातील एजंटगिरीवर आता बंदी appeared first on पुढारी.

Go to Source