भुरळ ‘बावडी’ची

काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारांचा विश्वचषकासह एक फोटो व्हायरल झाला. या फोटोची खूप चर्चा झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यांनी एका ‘बावडी’समोर काढलेला तो फोटो होता. प्राचीन आणि आकर्षक ‘बावडी’ पाहून पॅट कमिन्सलाही भुरळ पडली. या फोटोमुळे लोकांच्या मनात विस्मृतीत गेलेल्या बावड्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. देशातील काही … The post भुरळ ‘बावडी’ची appeared first on पुढारी.

भुरळ ‘बावडी’ची

– सुचित्रा दिवाकर

काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारांचा विश्वचषकासह एक फोटो व्हायरल झाला. या फोटोची खूप चर्चा झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यांनी एका ‘बावडी’समोर काढलेला तो फोटो होता. प्राचीन आणि आकर्षक ‘बावडी’ पाहून पॅट कमिन्सलाही भुरळ पडली. या फोटोमुळे लोकांच्या मनात विस्मृतीत गेलेल्या बावड्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.
देशातील काही भागात मोठ्या आकाराच्या बावड्या असून, तेथे पर्यटन स्थळ विकसित करता येऊ शकते; पण या बावड्यांवर सध्या समाजकंटकांचा ताबा आहे. बावड्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रामाणिक पुढाकार घेतला, तर त्यांना आपल्या मुख्य प्रवाहात आणू शकतो. यानुसार प्राचीन बावड्या अजूनही अर्थहीन झालेल्या नाहीत, हे सिद्ध होईल. त्यांचे अस्तित्व अधोरेखित होईल. काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारांचा विश्वचषकासह एक फोटो व्हायरल झाला. या फोटोची खूप चर्चा झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यांनी एका ‘बावडी’समोर काढलेला तो फोटो होता. प्राचीन आणि आकर्षक ‘बावडी’ पाहून पॅट कमिन्सलाही भुरळ पडली. या फोटोमुळे लोकांच्या मनात विस्मृतीत गेलेल्या बावड्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. या दोन कर्णधारांच्या फोटोत दिसणार्‍या बावडीला ‘राणीजी की बावडी’ असे म्हटले जाते. ‘राणीजी की वाव’ या नावाने प्रसिद्ध असलेले ठिकाण हे पाटन येथील आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी ‘बावडी’ म्हणून याकडे पाहिले जाते.
वास्तविक, बावड्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यांना संरक्षण मिळाले, तर पावसाचे पाणी साठवणे आणि जमिनीतील पाणी पातळी वाढविण्यास मोठा हातभार लावू शकतात. या बावड्या एवढ्या आकर्षक आहेत की, तेथील परिसराचे सुशोभीकरण करत एक ‘पर्यटन स्थळ’ म्हणून विकसित करता येऊ शकते. अनेक वर्षांपर्यंत ‘राणीजी की वाव’ ही सरस्वती नदीच्या गाळाखाली दबलेली होती. कालांतराने भारतीय पुरातत्त्व विभागाने तिचा तपास घेतला आणि त्यानंतर याठिकाणी लाखो पर्यटक दाखल होऊ लागले. युनेस्कोने 22 जून 2014 रोजी ‘जागतिक वारसा’ म्हणून या बावडीला घोषित केले.
प्राचीन काळात बावड्या उभारणीचा मुख्य उद्देश म्हणजे प्रवास करणार्‍या नागरिकांना पाण्याची सहज उपलब्धता करून देणे. म्हणून प्रवास मार्गावर, मंदिरांच्या बाहेर किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणाजवळ बावड्या दिसतात. अर्थात, या बावड्या विहीर किंवा आड यापेक्षा वेगळ्या असतात. या बावड्यांच्या व्यवस्थेनुसार, एखादा व्यक्ती किंवा संपूर्ण लोकांचा गट हा काही काळासाठी आराम करू शकतो. अरवली पर्वताच्या कुशीत वसलेल्या या शहरात सत्तर भव्यदिव्य बावड्या आहेत. या ठिकाणीही एक ‘राणीजी की बावडी’ असून, ती मुख्य बाजारपेठेत आहे. या बावडीच्या मध्यभागी असणारे नक्षीदार तोरण हे सर्वांचे लक्ष वेधून घेते. पाणी आणण्यासाठी शंभर पायर्‍यांची सुविधा आहे. खरे तर 1984 पर्यंत या बावड्यांकडे दुर्लक्ष झाले होते; परंतु काही लेखकांनी या बावड्यांच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकला. कालांतराने बावड्यांच्या स्थितीत सुधारणा झाली.
स्थानिक नागरिक ‘दूध बावडी’ला कामधेनूचे प्रतीक मानतात. इतिहासकारांच्या मते, राजस्थानची ‘चंदबावडी’ ही सध्याच्या बावडीच्या तुलनेत सर्वात जुनी आहे. कारण बावडीचे बांधकाम हे पुण्यकर्म मानले जाते आणि त्यामुळे बावडी तयार करताना वास्तूचे नियम पाळले जात. प्राचीन ग्रंथ ‘अपराजितप्रेच्छा’ आणि ‘विश्वकर्मा’ वास्तुशास्त्रात बावड्यांच्या निर्मितीबाबत सविस्तर लेख आहे. ‘अपरिजितप्रेच्छा’नुसार बावडीत श्रीधर, जलसाई, अकरा रुद्र, उमा-महेश्वर, कृष्ण दंडपाणी, दिक्पाल, मातृका, गंगा आणि नवदुर्गा यांचे वास्तव्य असणे गरजेचे आहे. म्हणून निर्मितीकार हे बावड्यांत देवतांच्या प्रतिमा उभारत. आजघडीला माहितीच्या अभावामुळे आपण प्राचीन काळाचा साक्षीदार असलेला हा वैशिष्ट्यपूर्ण ठेवा विसरत आहोत.
The post भुरळ ‘बावडी’ची appeared first on पुढारी.

काही दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारांचा विश्वचषकासह एक फोटो व्हायरल झाला. या फोटोची खूप चर्चा झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यांनी एका ‘बावडी’समोर काढलेला तो फोटो होता. प्राचीन आणि आकर्षक ‘बावडी’ पाहून पॅट कमिन्सलाही भुरळ पडली. या फोटोमुळे लोकांच्या मनात विस्मृतीत गेलेल्या बावड्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. देशातील काही …

The post भुरळ ‘बावडी’ची appeared first on पुढारी.

Go to Source