वीरप्पनने रजनीकांत यांना राजकारणात न येण्याचा दिला होता सल्ला
पुढारी ऑनलाईन डेस्क : कूस मुनिसामी वीरप्पन वेब सीरीजचा प्रीमीयर आज १४ डिसेंबर रोजी झी ५ वर रिलीज झाला. ही कहाणी चंदन तस्कर वीरप्पन वर आधारित आहे. झी ५ ने साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या वाढदिवसाला कूस मुनिस्वामी वीरप्पन नावाच्या डॉक्युमेंट्रीतील एक प्रोमो व्हिडिओ जारी केला होता. (Koose Munisamy Veerappan series) यामध्ये वीरप्पनने रजनीकांत यांना राजकारण सहभागी न होण्याचा सल्ला दिला होता. ही मालिका वीरप्पनचे जीवन आणि कुख्यात डाकूच्या शोधात गुंतलेल्या लोकांचा शोध घेते. यात वीरप्पन, पत्रकार, राजकारणी आणि पीडित कुटुंबांच्या मुलाखती दाखवल्या आहेत. (Koose Munisamy Veerappan series)
एका छोट्या व्हिडिओमध्ये वीरप्पन रजनीकांतविषयी बोलताना दिसतोय. तो रजनीकांत यांची माजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री, स्टार एम जी रामचंद्रन यांच्याशी तुलना करतो. वीरप्पन म्हणतो, ”त्यांनी (एमजीआर) संघर्ष केलं आहे. म्हणून त्यांना लोकांच्या समस्या, त्रास माहिती आहे. ‘एमजीआरसारख्या व्यक्तीने जन्म घेणे कठीण आहे. पण, मी चांगल्या पद्धतीने ओळखत होतो की, रजनीकांत देखील त्यांच्यासारखाच बनेल. ते सर्वांचे सन्मान करतात. ते कुणाचाही अपमान करत नाहीत. ते असे व्यक्ती आहेत, जे परमेश्वरावर खूप विश्वास करतात.”
क्लिप दुसऱ्या सेटिंगमध्ये कट केली जाते आणि वीरप्पन म्हणतो, “अय्या रजनीकांत औसत…मी तुमच्याशी बोलत आहे. कुणाशीही जोडले जाऊ नका, कुणाचेही समर्थन करू नका. अनेक मगरी तुमचे शोषण करण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत…तुमचा घात करून हल्ला करत आहेत…. मूर्ख बनू नका.’
Veerappan’s message to Rajinikanth!#KooseMunisamyVeerappan Premieres on Dec 14 #HBDSuperstarRajinikanth #HappyBirthdaySuperstarRajinikanth #HBDRajinikanth #VeerappanOnZEE5 #UnseenVeerappanTapes #Veerappan #ZEE5Tamil #ZEE5 pic.twitter.com/DBvtojfGxp
— ZEE5 Tamil (@ZEE5Tamil) December 12, 2023
व्हिडिओ क्लिप कधीची आहे, त्या तारखेचा खुलासा केलेला नाही. पण अंदाजे ९० च्या दशकात मध्यात शूट केलं गेलं होतं. जेव्हा रजनीकांत राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सुरु होती. १९९६ मध्ये रजनीकांत यांनी निवडणुकीआधी जयललिता यांच्याविरोधात स्टेटमेंट केले होते. २०१७ मध्ये रजनीकांत यांनी आश्वासन दिलं होतं की, २०२१ मध्ये राज्य निवडणूक लढतीस त्यानंतर त्यांनी आपल्या प्रशंसकांना निराश करत आपला निर्णय बदलला आणि आपले संपूर्ण लक्ष चित्रपटांकडे केंद्रीत केले.
आता रजनीकांत आगामी चित्रपट ‘वेट्टैयन’मध्ये दिसणार आहेत. टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित हा चित्रपट २०२४ मध्ये रिलीज होईल.
The post वीरप्पनने रजनीकांत यांना राजकारणात न येण्याचा दिला होता सल्ला appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : कूस मुनिसामी वीरप्पन वेब सीरीजचा प्रीमीयर आज १४ डिसेंबर रोजी झी ५ वर रिलीज झाला. ही कहाणी चंदन तस्कर वीरप्पन वर आधारित आहे. झी ५ ने साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या वाढदिवसाला कूस मुनिस्वामी वीरप्पन नावाच्या डॉक्युमेंट्रीतील एक प्रोमो व्हिडिओ जारी केला होता. (Koose Munisamy Veerappan series) यामध्ये वीरप्पनने रजनीकांत यांना राजकारण …
The post वीरप्पनने रजनीकांत यांना राजकारणात न येण्याचा दिला होता सल्ला appeared first on पुढारी.