धारावी प्रकल्पावरून सभागृहात सरकारला घेरणार : अंबादास दानवे
नागपूर ; पुढारी वृत्तसेवा धारावी व तेथील लघुउद्योग वाचविण्यासाठी दोन्ही सभागृहात महाविकास आघाडीचे आमदार सरकारला घेरणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
सरकारमध्ये खाते बदल होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेंडरवर सही केली आणि धारावीचा प्रकल्प अदानींच्या घशात घातला, असा गंभीर आरोप देखील दानवे यांनी केला आहे.
धारावी प्रकल्पात टीडीआर घोटाळा झाला आहे. हे सरकार जनतेसाठी की अदानीसाठी काम करतेय असा प्रश्न पडला आहे. ज्या प्रमाणे केंद्रातून अदानींना प्रोत्साहन दिलं जातंय त्याचप्रमाणे हे खोके गद्दार सरकार प्रयत्न करतंय. धारावीकरांवर होणारा अन्याय सहन करणार नाही, अशा शब्दांत दानवे यांनी सरकारला इशारा दिला.
हेही वाचा :
क्रिकेटपटू ख्वाजाने बुटांवर असं काय लिहिलं?, ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला खुलासा करणं भाग पडलं
MLA Suhas Kande : शासकीय पीकविमा कंपनी स्थापन करा; आमदार सुहास कांदे यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Food Delivery boy : निगेटिव्ह रिव्ह्युमुळे डिलिव्हरी बॉयची महिलेला धमकी; ‘जेवणात विष कालवेन आणि…
The post धारावी प्रकल्पावरून सभागृहात सरकारला घेरणार : अंबादास दानवे appeared first on पुढारी.
नागपूर ; पुढारी वृत्तसेवा धारावी व तेथील लघुउद्योग वाचविण्यासाठी दोन्ही सभागृहात महाविकास आघाडीचे आमदार सरकारला घेरणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. सरकारमध्ये खाते बदल होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेंडरवर सही केली आणि धारावीचा प्रकल्प अदानींच्या घशात घातला, असा गंभीर आरोप देखील दानवे यांनी केला आहे. धारावी प्रकल्पात टीडीआर घोटाळा …
The post धारावी प्रकल्पावरून सभागृहात सरकारला घेरणार : अंबादास दानवे appeared first on पुढारी.