पुढारी ऑनलाईन डेस्क : संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, साऊथ स्टार रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी यांच्या दर्जेदार भूमिका असलेल्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स आफिसवर ७०० कोटींच्या टप्पा पार केलाय. हा चित्रपट जगभरात चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. ‘अॅनिमल’ चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर काहीच दिवसांत ‘गदर २’ आणि शाहरूख खानच्या ‘जवान’, ‘पठाण’ चित्रपटांना मागे टाकले. चित्रपटाच्या कथेपासून ते कमाईपर्यंत सर्वच गोष्टींबाबत बरीच चर्चा होत आहे. दरम्यान अभिनेत्री तृप्ती डिमरी ( Tripti Dimri ) एका चित्रपटात नव्या अभिनेत्यासोबत रोमान्स करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित बातम्या
Andre Braugher: एमी विजेता स्टार आंद्रे ब्रूघेर काळाच्या पडद्याआड
Animal Anil Kapoor : ‘ॲनिमल’मधील अनिल कपूरचा असा तयार झाला बलबीर सिंग (Video)
Salman Khan : सलमानच्या मेकअप आर्टिस्टवर हल्ला; रॉडने मारहाण
‘अॅनिमल’ या चित्रपटात रणबीर आणि रश्मिकाच्या किसिंग सीनची चर्चा झाली खरी. मात्र, अभिनेत्री तृप्ती डिमरीच्या ( Tripti Dimri ) इंटिमेंट सीननं चाहत्यांना भूरळ घातली. इंटिमेंट सीननंतर तृप्ती चांगलीच चर्चेत आली शिवाय तिचे सोशल मीडियावर फॅन फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली. याच दरम्यान दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी तृप्तीला नव्या चित्रपटात कास्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आगामी चित्रपटात तृप्ती नव्या एका अभिनेत्यासोबत झळकणार असल्याची माहिती मिळाली.
एका रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, ‘अॅनिमल’ चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना त्यांच्या पुढच्या चित्रपटात अभिनेत्री तृप्ती डिमरीला घेण्याचे ठरविले असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाचे नाव ‘स्पिरिट’ असे आहे. या चित्रपटात साऊथचा सुप्रसिद्ध अभिनेता प्रभास दिसणार आहे. त्यामुळे आगामी ‘स्पिरिट’ चित्रपटात प्रभास आणि तृप्ती डिमरी ही जोडी एकत्रित दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबतची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती तृप्तीच्या टिमकडून मिळालेली नाही. याबाबतची खरी माहिती आगामी काळात समजणार आहे.
View this post on Instagram
A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)
The post इंटिमेंट सीन गाजताच तृप्ती ‘या’ अभिनेत्यासोबत करणार रोमान्स? appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, साऊथ स्टार रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी यांच्या दर्जेदार भूमिका असलेल्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स आफिसवर ७०० कोटींच्या टप्पा पार केलाय. हा चित्रपट जगभरात चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. ‘अॅनिमल’ चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर काहीच दिवसांत ‘गदर २’ आणि शाहरूख खानच्या ‘जवान’, …
The post इंटिमेंट सीन गाजताच तृप्ती ‘या’ अभिनेत्यासोबत करणार रोमान्स? appeared first on पुढारी.