जयंत पाटील पालकमंत्री असताना न्याय मिळाला नाही: वैभव पाटील

विटा: पुढारी वृत्तसेवा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असता पालकमंत्री आपला असतानाही आपल्याला कोणत्याच कामात न्याय मिळाला नाही, अशा शब्दांत विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. Vaibhav Patil On Jayant Patil विट्यात आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. … The post जयंत पाटील पालकमंत्री असताना न्याय मिळाला नाही: वैभव पाटील appeared first on पुढारी.
#image_title

जयंत पाटील पालकमंत्री असताना न्याय मिळाला नाही: वैभव पाटील

विटा: पुढारी वृत्तसेवा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असता पालकमंत्री आपला असतानाही आपल्याला कोणत्याच कामात न्याय मिळाला नाही, अशा शब्दांत विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. Vaibhav Patil On Jayant Patil
विट्यात आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी वैभव पाटील यांनी उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, राज्यात अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी आपल्या सर्वांच्या मनात द्विधा मनस्थिती होती. कारण चार वर्षांपूर्वी आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर २०१९ ला महाविकास आघाडी चे सरकार स्थापन झाले. Vaibhav Patil On Jayant Patil
त्यावेळी आपल्या मतदारसंघापुरते का होईना राष्ट्रवादीचे संघटन करावे, आपल्या कार्यकर्त्यांचा आणि आपला स्वाभिमान टिकला पाहिजे, यासाठी प्रयत्न करावा. तसेच आपल्याला राजकीय बळ मिळेल, असे आपल्याला वाटले होते. त्यावेळी सरकार आपले होते. पालकमंत्रीसुद्धा आपले होते. परंतु प्रत्यक्षात आपल्याला कोणत्याच कामात न्याय मिळाला नाही. त्यावेळी पालकमंत्री जयंत पाटील असताना आपण त्यांच्याकडून फक्त आपल्या कार्यकर्त्यांची कामे झाली पाहिजेत. प्रशासकीय पातळीवर त्यांची हेळसांड झाली नाही पाहिजे, तसेच विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला पाहिजे, इतकी माफक अपेक्षा होत्या. परंतु महाविकास आघाडीतील तीन पक्षांच्या त्रांगड्यांमध्ये स्थानिक आमदार शिवसेनेचा असल्यामुळे आपल्याला न्याय मिळाला नाही.
आम्ही वेळोवेळी पालकमंत्र्यांच्या कानावर घालत होतो, इथे भविष्यात राष्ट्रवादीचा आमदार व्हायचा असेल, पक्ष वाढवायचा असेल, जनतेची कामे व्हायची असतील, तर तुम्ही आम्हाला ताकद दिली पाहिजे. मात्र, प्रत्येक वेळी मंत्री पाटील आम्हाला सांगत की थोडीशी अडचण आहे, तीन पक्षाचे सरकार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी शिवसेनेचा आहे. आपण पुढच्या वेळी बघू ,
यावेळी संजय मोहिते, किरण तारळेकर, विनोद पाटील, विलास बापू पाटील, भगवान पाटील, सचिन शिंदे, अविनाश चोथे, लता मेटकरी, हर्षवर्धन बागल, प्रशांत सावंत आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा 

सांगली : वसंतदादा कारखान्याच्या दारात स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन
उत्तर प्रदेशातील सोने चोरीची पाळेमुळे सांगली जिल्ह्यापर्यंत
सांगली : ‘अशोक भाऊ, यंदा डांबावरच गडी टिपू या’; जिल्हास्तरीय खो-खो निवड चाचणी स्पर्धेत सुरेश पाटील यांची राजकीय टोलेबाजी

The post जयंत पाटील पालकमंत्री असताना न्याय मिळाला नाही: वैभव पाटील appeared first on पुढारी.

विटा: पुढारी वृत्तसेवा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असता पालकमंत्री आपला असतानाही आपल्याला कोणत्याच कामात न्याय मिळाला नाही, अशा शब्दांत विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. Vaibhav Patil On Jayant Patil विट्यात आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. …

The post जयंत पाटील पालकमंत्री असताना न्याय मिळाला नाही: वैभव पाटील appeared first on पुढारी.

Go to Source