देवाळे: पुढारी वृत्तसेवा : भोगावती साखर कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सभासदांनी आपल्या सर्व ऊस भोगावतीला पाठवावा.भोगावतीला पूर्वपदावर आणण्याचे काम आगामी पाच वर्षात करणार आहे असे प्रतिपादन भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील ( देवाळेकर ) यांनी हळदी परिसरातील आभार दौऱ्यात केले. Bhogwati Sugar Factory
भोगावतीच्या नूतन संचालक मंडळाने हळदी परिसरातील वाशी, शेळकेवाडी, कांडगाव, देवाळे, हळदी, कुरुकली, बेले, परिते, म्हाळुंगे आदी गावात आभार दौरा केला. यावेळी ते बोलत होते. Bhogwati Sugar Factory
प्रा. शिवाजीराव पाटील म्हणाले की, मीही स्वतः ऊस उत्पादक शेतकरी असून कामगार ऊस तोडणी वाहतूकदार यांच्याशी चर्चा करून जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी प्रयत्न करणार आहे. नवीन संचालक मंडळाने सत्तेवर येताच स्वतःच्या ठेवी ठेवून कामगारांचा बोनस दिला. यावर्षी गाळप होणाऱ्या सर्व उसाचे प्रति टन ३२०० रुपये देण्याची ग्वाही आपण देत आहोत. साखर कारखाना अडचणीत असला तरी सभासदांना अडचणीत आणणार नाही. ऊस विकास कार्यक्रम राबवून एकरी उत्पादन वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू, नेत्यांच्या व सभासदांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता आपण कारभार करू, यासाठी सर्वच घटकांनी सहकार्य करावे.
या आभार दौऱ्यात बी. ए. पाटील, बळवंत तातोबा पाटील, केरबा भाऊ पाटील यांच्यासह सभासदाने मनोगत व्यक्त केली. यावेळी उपाध्यक्ष राजाराम कवडे, बबन रानगे, दिगंबर मेडशिंगे, सर्जेराव पाटील, बाबासाहेब पाटील, संदीप पाटील, शरद पाटील यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
हेही वाचा
कोल्हापूर : अब्दुल लाट येथे ‘स्वाभिमानी’ च्या वतीने इथेनॉल निर्मिती बंदीच्या अध्यादेशाची होळी
कोल्हापूर : 13 कारखान्यांचे 200 कोटींचे उत्पन्न घटणार
कोल्हापूर : पूणे-बंगळूर महामार्गावर ट्रकला भीषण आग; तावडे हॉटेल येथील घटना
The post ‘भोगावती’ला उर्जितावस्था आणण्यासाठी सभासदांनी सहकार्य करावे: प्रा. शिवाजीराव पाटील appeared first on पुढारी.
देवाळे: पुढारी वृत्तसेवा : भोगावती साखर कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सभासदांनी आपल्या सर्व ऊस भोगावतीला पाठवावा.भोगावतीला पूर्वपदावर आणण्याचे काम आगामी पाच वर्षात करणार आहे असे प्रतिपादन भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील ( देवाळेकर ) यांनी हळदी परिसरातील आभार दौऱ्यात केले. Bhogwati Sugar Factory भोगावतीच्या नूतन संचालक मंडळाने हळदी परिसरातील वाशी, शेळकेवाडी, कांडगाव, …
The post ‘भोगावती’ला उर्जितावस्था आणण्यासाठी सभासदांनी सहकार्य करावे: प्रा. शिवाजीराव पाटील appeared first on पुढारी.