अन्याय, अत्याचाराच्या विरोधात लढत राहू: जयंत पाटील

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीर लोहखाणींचा विरोध करणाऱ्या आणि अन्याय, अत्याचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या आदिवासींना नक्षलवादी ठरविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, तुम्ही किती लोकांवर गोळ्या झाडणार आहात, असा सवाल करीत आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील यांनी अन्याय, अत्याचाराच्या विरोधात आम्ही लढत राहू, असा निर्धार व्यक्त केला. Gadchiroli News प्रागतिक पक्षांच्या महाराष्ट्र आघाडीतर्फे आज … The post अन्याय, अत्याचाराच्या विरोधात लढत राहू: जयंत पाटील appeared first on पुढारी.
#image_title

अन्याय, अत्याचाराच्या विरोधात लढत राहू: जयंत पाटील

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीर लोहखाणींचा विरोध करणाऱ्या आणि अन्याय, अत्याचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या आदिवासींना नक्षलवादी ठरविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, तुम्ही किती लोकांवर गोळ्या झाडणार आहात, असा सवाल करीत आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील यांनी अन्याय, अत्याचाराच्या विरोधात आम्ही लढत राहू, असा निर्धार व्यक्त केला. Gadchiroli News
प्रागतिक पक्षांच्या महाराष्ट्र आघाडीतर्फे आज गडचिरोली येथील अभिनव लॉनवर आयोजित उलगुलान सभेत ते बोलत होते. ज्येष्ठ भाकप नेते कॉ.तुकाराम भस्मे, शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हरीश उईके, जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, भाकप नेते डॉ.महेश कोपुलवार, माकप नेते कॉ.अमोल मारकवार, कॉ.देवराव चवळे, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण खोब्रागडे, रोहिदास राऊत, अशोक निमगडे, बीआरएसपीचे प्रदेश सचिव विजय  श्रुंगारे, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे उपस्थित होते.
आदिवासींनीच जल, जंगल आणि जमिनीचे रक्षण केल्याने तोच नैसर्गिक संसाधनांचा मालक आहे. परंतु कुठलाही प्रकल्प उभारताना किमान ३५ टक्के जंगल राखीव ठेवण्याचे बंधन संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक बँकेने घालून दिले असताना गडचिरोली जिल्ह्यात बेकायदेशीर लोहखाणी निर्माण केल्या जात आहेत. शिवाय या माध्यमातून आदिवासींचे उपजीविकेचे साधन हिरावले जात आहे. मात्र, या विरोधात आवाज उठविणाऱ्या आदिवासींना नक्षलवादी ठरविले जाते. हे आता खपवून घेणार नाही, असा इशारा आ.जयंत पाटील यांनी दिला. आदिवासी, दलित आणि ओबीसींच्या समस्या आपण विधिमंडळात मांडू, असेही त्यांनी सांगितले.
भाकप नेते कॉ.तुकाराम भस्मे म्हणाले की, पीक विमा कंपन्या हजारो कोटींनी शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. परंतु सरकारचे त्याकडे लक्ष नाही. हे सरकार भांडवलदारांची बाजू घेणारे सरकार असून,ते गोरगरिबांची बाजू घेईल, या भ्रमात राहायला नको.सरकार हीच आमची समस्या झाली आहे, अशी टीका भस्मे यांनी केली.
याप्रसंगी शेकाप नेते रामदास जराते, भाकप नेते डॉ.महेश कोपुलवार, माकप नेते अमोल मारकवार, रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रवीण खोब्रागडे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नेते हरीश उईके यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन हेमंत डोर्लीकर, तर आभार प्रदर्शन विनोद मडावी यांनी केले.
हेही वाचा 

गडचिरोली : चित्तरंजनपूरमध्ये तिहेरी अपघातात दोघेजण ठार, तिघे जखमी
गडचिरोली : तलवारीने केक कापून हिरोगिरी करणे तरुणांना भोवले; आरमोरी पोलिसांची कारवाई
Maratha Reservation Protest: गडचिरोली जिल्ह्यात ४९ हजार ६९१ कुणबी नोंदी

The post अन्याय, अत्याचाराच्या विरोधात लढत राहू: जयंत पाटील appeared first on पुढारी.

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीर लोहखाणींचा विरोध करणाऱ्या आणि अन्याय, अत्याचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या आदिवासींना नक्षलवादी ठरविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, तुम्ही किती लोकांवर गोळ्या झाडणार आहात, असा सवाल करीत आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील यांनी अन्याय, अत्याचाराच्या विरोधात आम्ही लढत राहू, असा निर्धार व्यक्त केला. Gadchiroli News प्रागतिक पक्षांच्या महाराष्ट्र आघाडीतर्फे आज …

The post अन्याय, अत्याचाराच्या विरोधात लढत राहू: जयंत पाटील appeared first on पुढारी.

Go to Source